महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन बुधवारपासून सुरू झाले आहे, त्याआधीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या सगळ्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठेच दिसत नाहीत, ते अधिवेशनात प्रत्यक्ष येणार का, त्यांची प्रकृती कशी आहे, याविषयी चर्चांना उधाण आले आहे, अशा वेळी मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधान भावनाबाहेर माध्यमांशी बोलताना केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे.
मुख्यमंत्र्यांचा आजार चिंताजनक
मुख्यमंत्री या अधिवेशनात उपस्थितीत राहणार का, असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुपस्थितीत राहिले, बुधवारीही अधिवेशनाच्या सुरुवातीला विधान भवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालताना अनुपस्थित होते, उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार घातला. मुख्यमंत्र्यांची प्रकृती अजून बारी नाही, त्यामुळे त्यांनी अधिवेशनात येण्याचा आग्रह धरू नये, त्यांना चिंताजनक आजार झाला आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
(हेही वाचा मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्ती ‘या’ आमदाराची ८ तास चौकशी)
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचा कारभार सोपवावा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अधिवेशनात येता येणार नसेल, तर त्यांनी त्यांचा कारभार मुलगा आदित्य ठाकरे यांच्या हाती सोपवावा, अथवा उप मुख्यमंत्री अजित पवार यांना द्या, जर शिवसेनेच्या नेत्यालाच द्यायचा असेल तर आणखी दुसरा पर्याय निवडावा, पण हे राज्य आणखी पुढे मुख्यमंत्र्यांशिवाय चालवता येणार नाही.
Join Our WhatsApp Community