मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना पाॅझिटिव्ह

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या पाठोपाठ आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना पाॅझिटिव्ह असल्याची बातमी समोर येत आहे. थोड्याच वेळात कॅबिनेटची बैठक होणार आहे. पण त्यापूर्वीच काॅंग्रेसचे नेता कमलनाथ आणि नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे माध्यमांना सांगितले आहे. त्यामुळे या कॅबिनेट बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑलनाइन पद्धताने हजेरी लावणार आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांची RTPCR चाचणी निगेटिव्ह आली आहे. पण अॅंटिजन चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे.

राजीनामा देण्याची शक्यता

दुपारी एक वाजता राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याने ते व्हर्च्युअली उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे बुधवारी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ते संध्याकाळी राजीनामा सादर करु शकतात असेही वृत्त आहे.

मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार 

खासदार संजय राऊत यांनी सरकार बरखास्त होण्याच्या दिशेने असल्याचे ट्वीट केले होते. आता याच ट्वीटवर काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते नाराज असल्याचे वृत्त समोर येत आहे. संजय राऊत कॅबीनेट मिनीस्टर नसताना, असे ट्वीट करत असल्याने, मविआच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. याबद्दलची तक्रारही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे समोर आले आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here