पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, सकाळी पुण्यात ते देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या शिळाचे लोकार्पण करण्यात आले. तिथे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुण्यात पंतप्रधानांच्या स्वागतासाठी होते, त्यानंतर पंतप्रधान मोदी ही मुंबईच्या दिशेने निघाले, तिथे आयएनएस शिक्रा येथे आले, त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वागतासाठी उपस्थित होते, तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते.
म्हणून मुख्यमंत्री नाराज झाले
मागील दोन वर्षांत जेव्हा दोन वेळा पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले, तेव्हा मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या स्वागतला विमानतळाकडे न जाता राजशिष्टाचारमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांमुळे मुख्यमंत्री ठाकरे नाराज होते, म्हणून ते पंतप्रधानांच्या स्वागताला टाळून नाराजी दर्शवत होते, त्यामुळे या दौऱ्यात मुख्यमंत्री येणार का, असा प्रश्न होता. अखेर मुख्यमंत्री ठाकरे हे जेव्हा पंतप्रधान मोदी मुंबईत आयसीएस शिक्रा येथे आले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी ते उपस्थित होते. यावेळी मुखमंत्र्यांसोबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते, मात्र पंतप्रधानांच्या सुरक्षारक्षक एसपीजीच्या जवानांनी त्यांना रोखले होते, मात्र यामुळे मुख्यमंत्री नाराज झाले, अशी चर्चा सुरु झाली.
(हेही वाचा वीर सावरकरांनी कारागृहात संत तुकारामांचे अभंग गायले – पंतप्रधान मोदी)
Join Our WhatsApp Community