मुख्यमंत्री ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! राज्यभर दौरा करणार

62

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी, १४ मे रोजीच्या जाहीर सभेनंतर ते पक्ष बांधणीसाठी पुन्हा नव्या उत्साहात सक्रिय होणार आहेत. ते राज्याचा दौरा करणार आहेत. त्यामाध्यमातून येणाऱ्या निवडणुकीसाठी उद्धव शिवसेना पुन्हा ताकद वाढवणार आहे.

मागील दीड वर्षे कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेर पडलेच नाहीत. वर्षा बंगल्यात राहूनच त्यांनी राज्याचा कारभार पाहिला. मात्र त्यामुळे त्यांच्यावर चोहोबाजूने टीका होत होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेपासून राज्याच्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. या दरम्यान ते शेतकरी, कष्टकऱ्यांच्या भेटीगाठी घेतील. त्यांच्या समस्या जाणून घेतील. सोबतच शिवसैनिकांसोबत संवाद साधतील.

(हेही वाचा बूस्टर डोस माहीत नाही, पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल; राऊतांची भाजपवर फटकेबाजी)

राज्यभर सभा घेणार 

मुंबईत शिवसेनेची बीकेसी येथे सभा होत आहे. या सभेतून मुख्यमंत्री ठाकरे भाजप आणि मनसेचा समाचार घेण्याची सभा आहे. भाजप आणि मनसेकडून सातत्याने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांचा समाचार मुख्यमंत्री ठाकरे आजच्या सभेतून घेऊ शकतात. आजच्या सभेनंतर मुख्यमंत्री राज्याचा दौरा करणार आहेत. त्याची तयारी शिवसेनेकडून सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ठाकरे राज्यभरात फिरतील. लोकांच्या समस्या जाणून घेतील. शेतकरी आणि कष्टकऱ्यांसी संवाद साधतील. त्यासाठी विभागवार नियोजन सुरू असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.