महाराष्ट्रात एवढ्या सगळ्या घडामोडी घडत असताना दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांसाठी 30 एप्रिल रोजी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. पंतप्रधान मोदींची नुकतीच दोन दिवसांपूर्वी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीवरुन काही राज्यांना सुनावले होते. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला जाण्यास नकार दिला आहे. त्यांच्याऐवजी परिवहन मंत्री अनिल परब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अशा प्रकारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांना याआधीही टाळले.
नाराजी वैयक्तिक पातळीवर उतरली!
सध्या केंद्र सरकार आणि महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार यांच्यावर संघर्ष सुरु असल्याचे दिसून येत आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांनी कधीही याविषयी मतप्रदर्शन केले नाही, परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्री मात्र त्याविषयी उघडपणे आरोप करतात. ही नाराजी आता वैयक्तीक पातळीवर उतरली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांची बैठक असो किंवा पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असोत मुख्यमंत्री ठाकरे त्याकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे आपापसातील हा रुसवा फुगवा महाराष्ट्राच्या विकासाच्या मार्गामध्ये धोंडा म्हणून राहणार आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी केव्हा टाळलेले पंतप्रधानांना?
कोविड बैठकीत गैरहजर!
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात काहूर माजवले होते, मृत्यूचे आकांडतांडव सुरु होते. त्यानंतर तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे अशा वेळी केंद्र आणि राज्यात समन्वय असणे नितांत गरजेचे होते. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक घेतली, तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर राहिले. त्यावेळी शारीरिक आजाराचे कारण दिले, मात्र त्यानंतर काही तासांतच मुख्यमंत्री दुसऱ्याच दिवशी मुंबई महापालिकेच्या लहानशा अॅपच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते.
विमानतळावर गेलेच नाही!
पंतप्रधान एखाद्या राज्यात येतात, तेव्हा विमानतळावर संबंधित राज्याचा मुख्यमंत्री उपस्थित असतो, तसा राजशिष्टाचार आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत आले, तेव्हा मुख्यमंत्री ठाकरे यांनी विमानतळावर जाणे टाळले.
(हेही वाचा ठाकरे विरुद्ध ठाकरे! तेच शहर, तेच ‘मैदान’!)
मेट्रोच्या उदघाटनाला अनुपस्थित!
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले. केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई होत असल्यामुळे मुख्यमंत्री नाराज झाले, म्हणून ते कार्यक्रमाला गेले नाही, अशी चर्चा त्यावेळी सुरु झाली.
लता मंगेशकर पुरस्कार वितरणाला दांडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २४ एप्रिल २०२२ रोजी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यासाठी स्वतः पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते, त्या कार्यक्रमाला न जाता मुख्यमंत्री ठाकरे सह कुटूंब राणा दाम्पत्याला विरोध करणाऱ्या ९२ वर्षीय वृद्ध महिला शिवसैनिकाला भेटण्यासाठी परळ येथे गेले.
Join Our WhatsApp Community