‘मातोश्री’ला चारही बाजुंनी घेरले; आता नंबर कोणाचा?

146

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या ११ मालमत्ता ईडीने सील केल्यानंतर पुन्हा एकदा राजकारणातील मोठ्या भूकंपाची जाणीव झाली. या आधी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, खासदार संजय राऊत, आमदार रवींद्र वायकर, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव, आमदार यामिनी जाधव यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरांवर आयकर व ईडीच्या धाडी पडल्याने मातोश्री हादरुन गेली होतीच. पण आता थेट रश्मी ठाकरे यांच्या भावावरही ईडीने कारवाई करत मातोश्रीला चारही बाजुंनी घेरुन टाकले आहे.त्यामुळे मातेश्रीच्या उंबरठा पार करायला आता फार वेळ लागणार नसून तसे झाल्यास महाराष्ट्रातील राजकारणातील तो मोठ्या रिश्टर स्केलचा भूकंप ठरेल.

यशवंत जाधवांसह त्यांच्या संबंधित ३३ ठिकाणी धाडी

सध्या राजकारण्यांमधील आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकार समोर येत असून आजवर सरकारमधील दोन मंत्री तुरुंगात गेले आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अडकले असताना आता शिवसेनेचेही काही नेते, मंत्री आणि खासदार आमदार यांचीही आयकर तसेच ईडीच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशी सुरु आहे. त्यामुळे आजवर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, जोगेश्वरीतील आमदार रविंद्र वायकर, खासदार संजय राऊत तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांनाही आयकर तसेच ईडीच्या नोटीसनंतर त्यांच्या मालमत्तांची तपासणी होत आहे. त्यातील यशवंत जाधव यांच्यासह त्यांच्या संबंधित ३३ ठिकाणी आयकरने धाडी मारून बेहिशोबी मालमत्ता जप्त केली. त्यानंतर राज्याचे मंत्री अनिल परब यांच्या संबंधितांच्या घरीही आयकर विभागाने धाडी मारल्या. त्याआधी आमदार रविंद्र वायकर यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ईडीची चौकशी सुरु आहे.या प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावरही तक्रारदाराने काही जागा खरेदी केल्याचे आरोप केले आहेत खासदार संजय राऊत यांच्या पत्नीलाही ईडीने चौकशीसाठी बोलावले होते.

(हेही वाचा – बँकांची कामं पटापट उरका! कारण…तब्बल 15 दिवस बँका राहणार बंद)

‘मातोश्री’ला चारही बाजुंनी घेरले

याशिवाय शिवसेनेच् आनंद अडसूळ, भावना गवळी यांच्यासह अनेक जण ईडी व आयकर विभागाच्या रडावर असले तरी परब, राऊत, वायकर आणि जाधव हे मातोश्रीच्या अगदी जवळचे आहे. त्यामुळे आजवर केवळ मातोश्रीच्या दरवाजावर टक टक सुरु असतानाच मंगळवारी रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील मालमत्ता सील करण्यात आल्या. त्यामुळे मातोश्रीला आता चारही बाजुंनी जखडून ठेवल्याचे चित्र दिसून येत आहे.

या राजकीय युध्दात अंत होणार

एका बाजुला मुख्यमंत्री हे आरोग्याच्या समस्येतून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे त्यांच्या भोवतीच्या समस्या अजून दृढ होत आहेत. आयकर आणि ईडीच्या धाडीमागील खापर भाजपप्रणित केंद्र सरकारवर शिवसेना फोडत असतानाच दुसरीकडे राज्यातील पोलीस यंत्रणा आणि महापालिका यंत्रणांचा वापर करत भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह भाजपच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने गुन्हा दाखल करणे किंवा अनधिकृत बांधकामप्रकरणी कारवाईची नोटीस पाठवणे अशाप्रकारचे प्रयत्न सरकारकडूनही सुरु असल्याने या राजकीय युध्दात दोघांचाही अंत होईल अशी भीती राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.