“निवडणुकीत भाजपने माझ्या चेहऱ्याचा वापर केला”!

147

निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमीत शहा यांनी माझ्या चेहऱ्याचा वापर केला, असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. बाळासाहेब ठाकरेंच्या 96 व्या जयंती निमित्त शिवसैनिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

अमिच शहांना लगावला टोला

यावेळी ठाकरे म्हणाले की, आज मी तुमच्यासमोर खूप दिवसांनी आलो. मधले एक-दोन महिने माझे उपचारामध्ये गेले. लवकरात लवकर मी बाहेर पडून महाराष्ट्र पिंजून काढणार. जे माझ्या विरोधात तब्येतीची काळजी घेत आहेत, त्या विरोधकांना मी भगव्याचे तेज दाखवणार आहे. हे काळजीवाहू विरोधक कधीतरी आपले विरोधक होते, ज्यांना आपण पोसलं, मागेही मी म्हणालो की 25 वर्षे आपली युतीमध्ये सडली. ते मत ठाम आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.तसेच हिंदूत्वासाठी आपल्याला सत्ता हवी होती. आजचे यांचे हिंदूत्व हे सत्तेसाठीचे आहे. त्यांनी हिंदूत्वाचे कातडे पांघरले. अनेकदा आपल्यावर टीका होते. आम्ही हिंदुत्व नाही सोडले, दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडले, हिंदूत्व नाही. भाजप म्हणजे हिंदूत्व नाही, असेही ठाकरे म्हणाले. अमित शहा आपल्यावर टीका करुन म्हणाले, एकट्याने लढा. आम्ही हे आव्हान स्वीकारले आहे. आव्हान द्यायचे आणि मागे इडीची पीडा लावायची हे शौर्य नसल्याचा टोला त्यांनी लगावला.

( हेही वाचा: दिल्ली काबीज करण्याचे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करायचेय…)

हे हिंदूत्व नाही 

ते आपल्यावर टीका करतात की, आपण मोदी-शहांच्या चेहऱ्याचा वापर केला, तर तसेच भाजपनेही आपल्या चेहऱ्याचा वापर केला आहे, असे आपण म्हणू शकतो. मोदी आणि शहांच्या निवडणुकीचा अर्ज भरायला आपल्याला आग्रहाने बोलावले गेले ते कशासाठी ? अत्यंत आग्रहाने यासाठी बोलावले गेले कारण, त्यांनाही आपल्या चेहऱ्याचा वापर करायचा होता, असा दावा ठाकरे यांनी केला. यावेळी भाजपला उद्देशून ठाकरे म्हणाले की, ते दिवस आठवा ज्यावेळी यांचे डिपॉझिट जप्त व्हायचे. त्यावेळी यांनी प्रादेशिक पक्षाशी युती करुन सरकार चालवले. आता तोच भगवा पुसट होत चालला आहे. हे नवहिंदुत्ववादी हिंदुत्वाचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी करत आहेत. सोयीप्रमाणे बदलणारे हिंदुत्व आमचे नाही. सत्ता पाहिजे म्हणून हिंदुत्वाद्यांशी युती, संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीश कुमारशी युती, मेहबुबा मुफ्तीशी युती, असे करणारे हे नवहिंदुत्वावादी आहेत. हिंदुत्व असे असू शकत नाही. खरे हिंदुत्ववादी असेल, तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एक धोरण करुन चला. आम्हाला गुलामासारखं वागवू इच्छित होता. आम्ही सूर्य उगवल्यावर शपथ घेतली अंधारात नाही. चोरून मारुन नाही. आम्ही करतो ते उघडपणाने करतो. तुम्ही दिलेलं वचन मोडंल म्हणून आम्ही घऱोबा केला. अनेक ठिकाणी सरकार पाडून घरे तोडून सरकार स्थापन केलं आणि लोकशाहीच्या गप्पा मारल्या हे हिंदुत्व नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.