CM Yogi Adityanath : आमचे संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी आहेत, मोगलांशी नाही

आज शक्ती आणि भक्ती एकत्र आली आहे. भक्ती आणि शक्तीच्या संगमामुळे अयोध्येत भव्य राममंदिराचे बांधकाम झाले, ज्याने ५०० वर्षांच्या गुलामगिरीची गाथा मोडली. या भव्य कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याची संधी आम्हाला मिळाली हे आमचे भाग्यच.

273
CM Yogi Adityanath : आमचे संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी आहेत, मोगलांशी नाही

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी रविवारी (११ फेब्रुवारी) महाराष्ट्रातील पुणे येथे गीता भक्ती अमृत महोत्सवाला हजेरी लावली. या महोत्सवाचा एक भाग म्हणून ते म्हणाले की, भक्ती आणि शक्तीच्या संगमामुळे ५०० वर्षांच्या गुलामगिरीची गाथा मोडून अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्यात आले आहे. मुघल सम्राट औरंगजेबाला आव्हान दिल्याबद्दल योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचेही कौतुक केले.

(हेही वाचा – Dr. Neelam Gorhe : पक्षवाढीसाठी महिला शिवसैनिकांनी सकारात्मकपणे काम करावे – डॉ. नीलम गोऱ्हे)

New Project 2024 02 11T132705.914

भक्ती आणि शक्ती एकत्र विलीन झाली : योगी आदित्यनाथ

यावर्षी २२ जानेवारीला रामलल्ला यांचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम अयोध्येत भव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. “आज शक्ती आणि भक्ती एकत्र आली आहे. भक्ती आणि शक्तीच्या संगमामुळे अयोध्येत भव्य राममंदिराचे बांधकाम झाले, ज्याने ५०० वर्षांच्या गुलामगिरीची गाथा मोडली. या भव्य कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याची संधी आम्हाला मिळाली हे आमचे भाग्यच.” (CM Yogi Adityanath)

(हेही वाचा – Maharashtra State Hindi Sahitya Academy : पत्रकारितेबद्दलची नकारात्मकता संपवायची असेल तर शिक्षण क्षेत्रातीलडाव्यांचा प्रभाव संपवावा लागेल – स्वप्नील सावरकर)

आमचे संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी आहेत, मोगलांशी नाही – योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) पुढे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात आपण भक्ती आणि शक्तीचे उत्तम उदाहरण पाहू शकतो. जेव्हा मी उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री झाले, तेव्हा पहिल्यांदा आग्र्याला गेलो. “तिथे एक मुघल संग्रहालय उभारले जात होते. मी म्हटले की या संग्रहालयाचे नाव ‘छत्रपती शिवाजी संग्रहालय’ असावे. कारण आमचे संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी आहेत, मुघलांशी नाही. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात डिफेन्स कॉरिडॉरची घोषणा केली आहे ती सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित आहे. (CM Yogi Adityanath)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.