उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी पश्चिम बंगालमधील हिंसाचारावरून ममता बॅनर्जी यांच्यावर निशाण साधला. ममता बॅनर्जी दंगलखोरांना शांतीदूत म्हणतात. ज्याला बांगलादेश आवडतो त्याने बांगलादेशात जावे. दंगलखोरांवर लाठी हाच एकमेव उपचार आहे, असे मुख्यमंत्री योगी म्हणाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंगाल हिंसाचारावरून बंगाल सरकारवर निशाणा साधला. मंगळवारी, १५ मार्चला हरदोई जिल्ह्यातील अमर योद्धा राजा नरपती सिंह यांच्या विजय दिनानिमित्त रुईया गढी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
२०१७ पूर्वी उत्तर प्रदेश देखील दंगलींचा बालेकिल्ला होता, पण आता दंगलखोर तुरुंगात आहेत किंवा देवाजवळ आहेत. पश्चिम बंगालचे संपूर्ण मुर्शिदाबाद आठवडाभरापासून जळत आहे. जर काही लोक बांगलादेशला पाठिंबा देत असतील तर त्यांनी तिथे जायला हवे होते. पश्चिम बंगाल जळत आहे आणि मुख्यमंत्री निष्क्रिय बसले आहेत.
हिंदू कधी सुरक्षित असतील?
मुख्यमंत्री योगी (CM Yogi Adityanath) म्हणाले की, “मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानू इच्छितो, ज्यांच्या हस्तक्षेपामुळे केंद्रीय दलांनी सुरक्षा व्यवस्था ताब्यात घेतली आहे. आज तेथे केंद्रीय दल तैनात आहेत. तुम्ही तेथील वेदना ऐकल्या असतीलच. या संपूर्ण मुद्द्यावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या मौनावरही मुख्यमंत्री योगी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते एकामागून एक धमक्या देत आहेत. बांगलादेशात जे घडले त्याचे ते समर्थन करत आहेत. जर तुम्हाला बांगलादेश आवडत असेल तर तिथे जा, तुम्ही भारताच्या भूमीवर ओझे का बनत आहात?, असेही मुख्यमंत्री योगी (CM Yogi Adityanath) म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये काय घडले?
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ विधेयकाविरोधात मुस्लिम संघटनांनी हिंसक निदर्शने केली, त्यादरम्यान दंगलखोरांनी एका घरात घुसून एका वडील आणि मुलाला ठार मारले. वडील आणि मुलगा पुतळे बनवण्याचे काम करायचे. त्याचवेळी, गोळीबारात आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला. मुर्शिदाबादमधील हिंसाचारात आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे आणि १५ पोलिस जखमी झाले आहेत. मुर्शिदाबादसह, दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील भांगर परिसरातही परिस्थिती तणावपूर्ण आहे. आयएसएफ कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला, वाहने जाळण्यात आली आणि पोलिसांवर हल्ला करण्यात आला. शेकडो हिंदूंनी पलायन केले आहे.
Join Our WhatsApp Community