CM Yogi Adityanath यांचा दंगलखोरांना इशारा; जर दंगल केली तर…

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी मंगळवारी येथे कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते.

96

सर्व दंगलखोर उंदरांसारखी कुरकुर करतात, पण बाहेर येण्याची हिंमत करत नाहीत. दंगल केली, तर काय परिणाम होतील? हे त्यांना माहिती आहे. आपल्या बाप-दाद्यांनी जे काही कमावले असेल, ते सरकार एका झटक्यात जप्त करून गरिबांमध्ये वाटून देईल, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी दिला.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी मंगळवारी येथे कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. या बरेलीत २०१७ पूर्वी वर्षाला वारंवार दंगली होत होत्या. पण गेल्या ८ वर्षांत एकही दंगल झाली नाही. आता बरेली विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहे. पायाभूत सुविधांचे नवे मॉडेल देत आहे. आज बरेलीमध्ये गुंतवणूक येत आहे. येथे उद्योग उभारले जात आहेत, असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) म्हणाले.

(हेही वाचा veer savarkar garden borivali west : लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आनंद लुटू शकतात; बोरिवलीतील वीर सावरकर उद्यानाचे वेळापत्रक!)

सपा प्रमुख म्हणतात की, गोवंशापासून दुर्गंधी येते. हेच त्यांचे वास्तव आहे. ते गायी कसायांना देत होते. जेव्हा आम्ही कसायांना नरकाच्या प्रवासावर पाठवले, तेव्हा यांना त्रास झाला. त्याचे सर्व कसाई मित्र नरकात गेले आहेत, ही त्यांची समस्या आहे. जेव्हा गायींचे संरक्षण करणे आव्हान होते, तेव्हा येथील भूमीपुत्र आमला येथील आमदाराने निराधार गायींसाठी ७७०० हून अधिक निवारागृहे सुरू केली. राज्य सरकार स्वतः तेथील १४ लाखांहून अधिक गुरांची काळजी घेत आहे. आम्ही काही शेतकऱ्यांना दिल्या आहेत. आपणही पाळा. एका गायीसाठी सरकार १५०० रुपये देते. गायींची सेवा करून पुण्य मिळवा, असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) म्हणाल्या.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.