CM Yogi यांनी राज्यपालांना दिले Veer Savarkar लिखित ‘सहा सोनेरी पाने’ पुस्तक भेट

127
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी १७ जुलै रोजी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची राजभवनात भेट घेतली. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) लिखित ‘सहा सोनेरी पाने’ हे पुस्तक भेट दिले.
मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावणारे थोर क्रांतिकारक, जातीनिर्मुलनासारखे समाजप्रबोधनाचे कार्य केलेले वीर सावरकर (Veer Savarkar) हे इतिहासातून शिकण्याचा आग्रहदेखील धरत असत. त्यामुळे त्यांनी ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकाच्या माध्यमातून इतिहासाचे दर्शन घडवले आहे. असे हे पुस्तक मुख्यमंत्री योगी यांनी राज्यपालांना भेट दिले.

राज्यपालाची भेट महत्त्वाची 

भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून उत्तर प्रदेशमध्ये काही मोठे बदल करण्याचे संकेत मिळत असताना ही बैठक झाली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीमुळे भाजपामध्ये जबाबदारीची विभागणी झाल्याचे मानले जाते. उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य या दोन प्रमुख नेत्यांमध्ये उघड मतभेद पाहायला मिळत आहेत.

केशव मौर्य यांनी शहा आणि नड्डा यांची भेट घेतली

उल्लेखनीय आहे की, मौर्य यांनी 16 जुलै रोजी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही पंतप्रधानांची भेट घेतली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.