महाराष्ट्रातील मराठा आंदोलनाची धग दिल्ली पर्यंत पोहीचली असून केंद्र सरकार तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची माहिती मिळतेय. याकरिता बुधवारी(१नोव्हेंबर) दिवसभरात कधीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्ली मध्ये बोलावण्यात येऊ शकते.तसेच मराठा आरक्षण संदर्भात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर दिल्लीकर बारीक लक्ष ठेऊन आहेत. प्रत्येक घटनेची माहिती घेऊन त्यावर उपाय योजना करण्यावर लक्ष देण्यात येणार आहे. (Maratha Reservation )
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याकडे स्वतः लक्ष देत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांना लवकरच दिल्लीला बोलविणार असल्याची चर्चा राजधानीत रंगली आहे.दरम्यान मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीयांच्या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही. यावरुन ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
(हेही वाचा : Air Pollution : मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी काय करणार , उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल)
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शिंदे सरकारने आज सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सकाळी या बैठकीत मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय काय तोडगा काढणार का? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष असणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community