शासनाची फसवणूक करुन दरेकर मध्यवर्ती ‘मुंबै बॅंके’चे बनले संचालक!

भाजप नेते प्रविण दरेकर हे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी म्हणजेच मुंबै बॅंकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवडून आले पण त्यांना सहकार विभागाने अपात्र ठरवले आहे. मुंबै बॅंकेवर याच प्रवर्गातून संचालक बनलेल्या दरेकर यांनी मजूर नसातानाही निवडणूक लढवून शासनाची फसवणूक केल्याचही उघड झालं आहे.

घोटाळ्यांचा पर्दाफाश करणार 

गेली अनेक वर्षे आमदार असतानाही मजूर असल्याचे भासवून मुंबै बँकेत संचालक म्हणून निवडणूक लढवत होते. ही बँकेची तसेच हजारो ठेवीदारांची फसवणूक असून याप्रकरणी आपण पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे आपचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी सांगितले. तसेच, सहकार विभागाच्या आदेशाचा अभ्यास करून आपण कायदेशीर कारवाईसाठी संबंधित ठिकाणी पत्र देऊन मुंबै बँकेतील घोटाळय़ांचा पर्दाफाश करणार असल्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

केवळ मजूर व्यक्तीच पात्र

या आदेशात शिंदे यांनी म्हटले आहे की, सहकार आयुक्तांच्या २८ फेब्रुवारी १९७५ परिपत्रकातील तरतुदीनुसार, फक्त अंगमेहनतीचे काम करणारी व्यक्ती आणि अल्प व अत्यल्प भूधारक व्यक्ती जी अंगमेहनतीचे काम करते आणि कोणत्याही प्रकारचे बांधकाम कंत्राट घेत नाही. तसेच बांधकाम साहित्य वाहतुकीचे कंत्राट घेत नाही अशा व्यक्ती मजूर संस्थेचे सभासद होण्यास व तिचे सभासदत्व पुढे चालू राहण्यास पात्र राहील. मजूर सहकारी संस्थेच्या उपविधीतील प्रकरण दोनमधील नियम क्रमांक नऊप्रमाणे संस्थेचे सभासदत्व हे फक्त मजूर व्यक्तिलाच देण्यात येते.

( हेही वाचा: यंदाच्या कोरोनाला हलक्यात घेऊ नका, पहिल्या दोन लाटांच्या तुलनेत तिसरी लाट भयंकर…)

शासनाची फसवणूक

आमदार म्हणून निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील कोटय़वधींची मालमत्ता तसेच व्यावसायिक म्हणून केलेली नोंद आणि आमदार- विरोधी पक्षनेते म्हणून अडीच लाख रुपये मानधन मिळविणारी व्यक्ती मजूर असूच शकत नाही हेही या आदेशातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे  १९९७ पासून मुंबै बँकेवर याच प्रवर्गातून संचालक बनलेल्या दरेकर यांनी मजूर नसतानाही निवडणूक लढवून शासनाची फसवणूक केल्याचेही या निमित्ताने उघड झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here