राजस्थानमध्ये भाजपने दुसऱ्या टप्प्यातील परिवर्तन यात्रेचा (Parivartan Yatra) शुभारंभ केला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डुंगरपूर येथे बोलताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर टीका केली आहे. ‘यूपीए सरकारने 10 वर्षे राजस्थानला काय दिले’, असा सवाल अमित शाह यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांना केला. त्यांनी गेहलोत यांच्यावर हल्ला चढवत, “मी एका व्यापाऱ्याचा मुलगा असून पूर्ण हिशेब घेऊन आलो आहे’, असे ठणकावले. राजस्थानच्या विकासाच्या मुद्द्यावर अमित शहा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर टीकेची तोफ झाडली. मोदी सरकारने राजस्थानमध्ये केलेल्या विकासकामांचीही शाह यांनी यादी वाचली. 80,000 शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी जमा करण्यासारखे अनेक मुद्दे त्यांनी जनतेसमोर ठेवले.
(हेही वाचा – G20 Conference : परिषदेच्या तयारीला वेग; नेत्र विमानाच्या माध्यमातून दिल्लीच्या हवाई क्षेत्रावर नजर)
एकीकडे त्यांनी वसुंधरा राजे यांचे कौतुक केले, तर दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जातीयवादी धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शाह म्हणाले, “गेहलोत साहेब, तुम्ही तुमच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात काय केले, याचा हिशेब पत्रकार परिषदेत द्या, असे मी आव्हान देतो. वागद भागातील सर्व मंदिरांमधून आम्हाला आशीर्वाद मिळत राहतात. राजस्थानमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी परिवर्तन यात्रा काम करेल. परिवर्तन यात्रेचा टप्पा पूर्ण झाल्यावर गेहलोत सरकारची हकालपट्टी होईल.” (Parivartan Yatra)
मोदीजी पैसे पाठवतात; पण गेहलोत त्यात घोटाळा करत आहेत. मोदी सरकारने लोकांना कोरोना विरुद्ध लसीकरण मोफत दिले. गेहलोतजी, मी केंद्र सरकारच्या ९ वर्षांच्या कामाचे रिपोर्ट कार्ड सादर करू शकतो, तुम्ही काय करू शकता ? आता पत्रकार परिषद घेऊन गेल्या ५ वर्षात काय केले याचा हिशेब देण्याची वेळ आली आहे. तुमचे रिपोर्ट कार्ड सादर करा. राजस्थानमध्ये घोटाळा, भ्रष्टाचार आणि जातीयवादाचे धोरण याशिवाय तुम्ही काहीही केले नाही. याबद्दल जनतेला उत्तर द्या, अशा शब्दात अमित शाह यांनी जल जीवन मिशन योजनेतील घोटाळ्यावरून अमित शाह यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. (Parivartan Yatra)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community