विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्यासाठी समिती नियुक्त; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री Chandrakant Patil यांची माहिती

26
विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्यासाठी समिती नियुक्त; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री Chandrakant Patil यांची माहिती
विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्यासाठी समिती नियुक्त; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री Chandrakant Patil यांची माहिती

मुंबई प्रतिनिधी:

Chandrakant Patil : राज्यात विविध विद्यापीठांकडून उपकेंद्र (University Sub-Centre) स्थापन करण्यासाठी प्रस्ताव प्राप्त होत आहेत. या प्रस्तावांची व्यवहार्यता तपासण्यासाठी राज्य शासनाने एक विशेष समिती स्थापन केली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री (Minister of Higher and Technical Education) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पाटील बोलत होते. या चर्चेमध्ये सदस्य विक्रम काळे आणि भावना गवळी यांनीही सहभाग घेतला. (Chandrakant Patil)

स्थानिक लोकप्रतिनिधींनी निर्णय घ्यावा – मंत्री पाटील
मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले की, राज्यात अनेक ठिकाणी विद्यापीठ उपकेंद्र स्थापन करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील योग्य ठिकाणी उपकेंद्र स्थापन करण्याचा निर्णय घ्यावा.

(हेही वाचा – Matunga रेल्वे स्थानक आणि फुल बाजार परिसरातील ५२ दुकानांवर कारवाई)

विद्यापीठ व्यवस्थापनात ऑनलाईन प्रणालीचा प्रभाव
मंत्री पाटील म्हणाले की, पूर्वी विद्यापीठाच्या (University) प्रशासकीय कामांसाठी प्रत्यक्ष जावे लागत असे. मात्र, आता कामे ऑनलाईन पद्धतीने पार पडत असल्याने उपकेंद्राच्या कार्यपद्धतीत बदल होत आहेत. त्यामुळे, प्रशासकीय कामकाजासोबतच उपकेंद्रांमध्ये शैक्षणिक आणि कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याबाबत विचार केला जात आहे.

राज्यात “एक जिल्हा, एक विद्यापीठ” या धोरणाच्या (One district, one university policy) दिशेने सरकारची वाटचाल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, नवीन उपकेंद्रे स्थापन करण्यासाठी स्थानिक गरजा आणि उपलब्ध संसाधनांचा विचार करून समिती आपला अहवाल सादर करेल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.