संविधान घेऊन संविधानाबाबत खोटं बोलण्याचं पाप करत आहात; Chitra Wagh यांचा Rahul Gandhi यांच्यावर निशाणा

संविधान हाती घेऊन संविधानाबाबत धडधडीत खोटं बोलण्याचं पाप तुम्ही करत आहात. याचीही नोंद इतिहासात केली जाईल हे लक्षात ठेवा, असा घणाघात भाजप नेत्या Chitra Wagh यांनी Rahul Gandhi वर केला आहे.

148
संविधान हाती घेऊन संविधानाबाबत खोटं बोलण्याचं पाप करत आहात; Chitra Wagh यांचा Rahul Gandhi यांच्यावर निशाणा
संविधान हाती घेऊन संविधानाबाबत खोटं बोलण्याचं पाप करत आहात; Chitra Wagh यांचा Rahul Gandhi यांच्यावर निशाणा

संविधानाबाबत खोटाप्रचार करत जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारे राहुल गांधी आणि त्यांची टोळी, आज 25 जूनचा काळा दिवस पाळणार का? कारण बरोबर 49 वर्षांपूर्वी संविधान पायदळी तुडवण्याचं काम तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७५ साली केलं होतं याचा निषेध करण्याची हिंमत तुमच्यात आहे का? खरंतर तुमच्या पक्षातल्या आणि घराण्यातल्या लोकांनी संविधानाचा आणि श्रध्देय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा वारंवार अपमान केला आहे, याचा इतिहास तपासून पहा. संविधान बदलल्याची भाषा आणि कृती तुमच्या लोकांनी वारंवार केली. मात्र आता संविधान हाती घेऊन संविधानाबाबत धडधडीत खोटं बोलण्याचं पाप तुम्ही करत आहात. याचीही नोंद इतिहासात केली जाईल हे लक्षात ठेवा, असा घणाघात भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला आहे.

(हेही वाचा – Open Library : माटुंग्यातील पुलाखालील मोकळ्या जागेत नि:शुल्क ‘मुक्त ग्रंथालय’)

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संविधानाची प्रत हातात घेऊन खासदार पदाची शपथ घेतली. तसेच पंतप्रधान शपथ घेत असतांनाही त्यांनी संविधानाची प्रत उंचावून दाखवली. या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. संविधानाबाबत खोटाप्रचार करत जनतेच्या डोळ्यात धूळ करण्याचे काम राहुल गांधी आणि त्यांची टोळी करत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच त्यांनी देशभरात 25 जून काळा दिवस म्हणून साजरा करावा, असे आवाहन देखील चित्रा वाघ यांनी केले आहे.

या संदर्भात पोस्टच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. यामध्ये त्यांनी 49 वर्षांपूर्वी संविधान पायदळी तुडवण्याचे काम तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी 1975 साली केले असल्याची आठवण करुन दिली आहे. या घटनेचा विरोध म्हणून त्यांनी हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्याचे आवाहन देखील राहुल गांधी यांना केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.