Jitendra Awhad यांना आमदारकीचा राजीनामा देण्याचा सल्ला लोकांनी का दिला?

146
Secular शब्दावरून नेटकऱ्यांकडून मुंब्राच्या आव्हाडांना दिले बौद्धिक!
  • खास प्रतिनिधी 

राष्ट्रवादी कॉंग्रेस (शप) गटाचे नेते आणि मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग EVM विरोधात आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे, असा सल्ला जनतेने समाजमाध्यमावर दिला.

(हेही वाचा – Maharashtra Politics : चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सहा सदस्यांची विधान परिषदेची आमदारकी रद्द)

EVM विरोधाची लढाई

आव्हाड यांनी ‘EVM विरोधाची लढाई रस्त्यावर येऊन लढावी लागेल, आजपासून सुरूवात ठाणा, महाराष्ट्र’, अशा आशयाची पोस्ट X या समाजमध्यमावर केली. त्याला लोकांनी ट्रोल करत अगोदर आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा कारण तेही EVM वरच निवडून आले आहेत, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया व्यक्त झाली.


(हेही वाचा – Delhi Assembly Election : दिल्लीतील राखीव मतदारसंघावर BJP चा फोकस)

बांगलादेशवरही बोला

एकाने तर आव्हाड (Jitendra Awhad) यांचा ‘शरद पवार घरी बसा, घरी बसा’ असे म्हणत असल्याची क्लिप टाकली. तर एका नेटकऱ्याने बांगलादेशमधील हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्यावरही बोलण्याचा सल्ला दिला. तसेच एकाने भाजल्यानंतर लावण्यात येणाऱ्या ‘बर्नल’ या क्रीम ची आठवण करून दिली.

(हेही वाचा – Eknath Shinde यांना शपथ घेताना आठवले बाळासाहेब, दिघे आणि मोदी)

काही नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया जशाच्या तशा :

‘जित्या आव्हाड ची मियां भाई से फटती है, चालला पांडू रस्त्यावर लढाई करायला, तुझी दुवा कबूल केली ऊपरवाले ने बसला घरी शरद पवार.’

‘रस्त्यावर तर आलेलाच आहात.’

‘ये असलि डुब्लीकेट लढाई लढू नका जर खरच EVM घोटाळा झालाय तर जे अत्ता तुमच्या बरोबर निवडुन आलेत त्यांना राजीनामा द्यायला लावा म मानु खरी लढाई आहे…..’

‘पहिले तुमची निवड रद्द करून घ्या कारण तुम्ही पण त्याच ईव्हीएम मुळे निवडून आला आहात,’

‘सर, यावर काहीही बोलणं? इजराइलवरती बोलणं झालं आता बांगलादेशाबद्दल काही बोला की!’

‘लढाई अशी लढा की लोकांना खरी वाटेल, EVM विरोधातील लढाई तुम्ही चुकीचा मशीनने मिळवलेल्या आमदारकीचा राजीनामा देऊन करा. अशी मिळमिळीत लढाई तुम्हाला शोभत नाही.’

‘आपसात काय घालयचीय ती घाला.. नवीन पोस्ट बॉक्स घेऊन हवा तेवढा फुल्ल करून ठेवा.. पण हा बॉक्स इतका भरू नका की ज्याला वापरायचा असेल त्याची गैरसोय होईल.. आणि समोरच्या मेडिकल मधून burnol घ्या आठवणीने..’

‘तुम्हाला वाटत आहे ना EVM मध्ये घोळ झाला म्हणून, मग त्याच EVM मुळे तुम्ही विजयी झालात. जर EVM चे निकाल मान्य नाहीत तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुक आयोगाला सांगा जोपर्यंत EVM बंद होणार नाही, मी निवडणूक लढवणार नाही. त्यानंतर EVM वर आंदोलन चालु ठेवा… आमच काहीच म्हणण नाही.’

‘माझे आवाहन आहे जे सगळे आमदार आणि खासदार विरोधी पक्षात आहेत त्यांनी राजीनामा देऊन निषेध नोंदवावा,’

‘लढाई फक्त रस्त्यावर नको आकाश आणि पताळात पण लढ काहीच फायदा नाही.’

‘आता पाच वर्ष हेच करा,’

‘पाच वर्षे कळवा मुंब्रा येथे विकास करणार की रस्त्यावर येऊन अशी फालतू आंदोलने करणार…’

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.