- खास प्रतिनिधी
महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात ८५-८५-८५ हा फॉर्म्युला काँग्रेसने मान्य केला, याबाबत काँग्रेसमध्ये (Congress) प्रचंड प्रमाणात नाराजीचा सूर उमटत आहे. नाना पटोले यांनी ८५-८५-८५ फॉर्म्युला अमान्य केला मात्र तोच बाळासाहेब थोरात यांनी मान्य केल्याने पक्षांतर्गत धुसपुस वाढली आहे.
(हेही वाचा – Worli Assembly Constituency : काहीही झाले तरीही वरळीची जागा मनसे लढवणारच!)
राज्यात सगळ्यात मोठा पक्ष
काँग्रेस (Congress) पक्षात कार्यकर्त्यांमध्ये पटोले आणि थोरात यांच्याविरुद्ध वातावरण तयार होत असून त्यांनी काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला राष्ट्रवादी (शप) आणि शिवसेना उबाठासारख्या प्रादेशिक पक्षांच्या रांगेत आणून ठेवल्याची भावना काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. मुळात काँग्रेसची तुलना उबाठा आणि राष्ट्रवादीशी होऊ शकत नाही, कारण सध्या काँग्रेस राज्यात सगळ्यात मोठा पक्ष असूनही प्रादेशिक पक्षांशी बरोबरी करणे योग्य नाही, अशी चर्चा काँग्रेस गोटात होत आहे.
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election : शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसवर केली कुरघोडी)
१२५ वरून ८५ वर
काँग्रेसने (Congress) सुरूवातीला १२५ जागांची मागणी केली होती. त्यावर चर्चाही झाली. मात्र चर्चा पुढे सरकली तशी काँग्रेसची किंमत कमी होत गेली. काँग्रेसच्या जागा १२५ वरून ११० आणि अखेर ८५ वर रखडली आणि त्यावर थोरात-पटोले यांनी मान्यता दिली, यावरून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community