Nude Photoshoot: ‘मनसे’कडून अभिनेता रणवीर विरोधात तक्रार दाखल

136

काही दिवसांपूर्वी रणवीरने न्यूड फोटोशूट केले होते. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याच्या या फोटोशूटचे काहींनी कौतुक, तर काहींनी टीकाही देखील केली आहे. अशातच पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिनेता रणवीर सिंग याच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. अभिनेता रणवीर सिंगवर मनसेे शारीरिक सेना, पुणे शहर यांच्याकडून पोलिस आयुक्तालयात तक्रार करण्यात आली आहे. मनसे शारीरिक सेना, पुणे शहराचे अध्यक्ष निलेश काळे यांच्याकडून कलम 354, 509, 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

(हेही वाचा – LPG सिलिंडरच्या खाली ‘ही’ छिद्रे का असतात? तुम्हाला माहितीये? वाचा काय आहे कारण)

सोशल मीडियावर न्यूड फोटो प्रसिद्ध करून हिंदू संस्कृतीचा अपमान करत व स्त्रियांना फोटो पाहताना लाज वाटेल असे व तरुण वर्गाला बिघडवण्याची, त्यात वयात येणारी लहान मुले यांच्यावर वाईट संस्कार होण्याची भीती दर्शवली आहे, असा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावरून लवकरात लवकर काढावे अशी मागणी मनसेने यावेळी केली. प्रसिद्ध अभिनेत्याचे अनुकरण इतर लोक पण करू शकतील असा अंदाज वर्तवत या अभिनेत्याच्या कृत्यांना चाप बसला पाहिजे अशी मागणी यावेळी मनसेकडून करण्यात आली.

पुण्याप्रमाणे इतर ठिकाणी देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील श्याम मंगाराम फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या ललित श्याम यांनी महिलांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत चेंबूर पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आज, मंगळवारी रणवीर विरोधात भादंवि कलम २९२, २९३, ३५४, ५०९, आयटी कायदा कलम ६७(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हणणे आहे तक्रारदाराचे

तक्रारदार ललित श्याम यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारे फोटोशूट करून रणवीरने भारतीय संस्कृतीचे उल्लंघन केले आहे. यातून त्याने महिलांच्या भावना दुखावल्या आहेत. आपला देश हा संस्कृतीचं जतन, पूजा करणारा देश आहे. देशात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. परंतु या स्वातंत्र्याचा कुठे तरी गैरवापर होत आहे. तक्रारदारांच्या वकिलांनी म्हटले की, आमची मागणी रणवीर सिंहला अटक करावी, अशी आहे. कलमांची व्याप्ती पाहता भादंवि कलम २९२ अंतर्गत ५ वर्षे, कलम २९३ अंतर्गत ३ वर्षे शिक्षेची तरतूद आहे. तसेच आयटी कायदा कलम ६७(अ) नुसार ५ वर्षांची शिक्षा होऊ शकते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.