Gujarat Assembly election 2022: पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, काय आहे आरोप?

87

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले आहे. येत्या दोन दिवसात येणाऱ्या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सोमवारी गुजरातमध्ये शेवटच्या टप्प्यासाठी एकूण ९३ मतदार संघासाठी मतदान पार पडले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील अहमदाबादच्या रानिप येथील निशान शाळेतील मतदान केंद्रावर उपस्थिती लावत मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान या मतदानासाठी जात असताना मोदींनी रोड शो केल्याची तक्रार निवडणूक आयोगाला प्राप्त झाली होती. यानंतर आता आयोगानेही या प्रकरणी मोदींविरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे.

(हेही वाचा – बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्र्यांची ग्वाही; म्हणाले, ‘इंदू मिलमधील स्मारक…’)

कोणी दाखल केली तक्रार

गुजरात काँग्रेसच्या लॉ सेलचे अध्यक्ष योगेश रावाणी यांनी याबाबत तक्रार केली होती. रोड शो दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचा झेंडा घेऊन भगवा स्कार्फ धारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यासह मतदान करण्यासाठी जात असताना रानिप येथील मतदान केंद्रापासून ५०० ते ६०० मीटर अंतरावर मोदी कारमधून खाली उतरले आणि आजूबाजूला जमलेल्या लोकांसोबत चालत गेले. हा आचारसंहितेचा भंग असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.