परमबीर सिंग यांच्यावर पुन्हा नवीन गुन्हा दाखल! अडचणी वाढणार

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांच्यावर अनेक गुन्हे देखाल झाले असताना, आता पुन्हा त्यांच्यासह काही वरिष्ठ पोलिस अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहेत आरोप?

ठाण्यातील बिल्डर व्यावसायिक असलेल्या श्याम सुंदर अग्रवाल यांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात तक्रार केली आहे. खटला मागे घेण्यासाठी परमबीर सिंग यांनी आपल्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप त्यांनी या तक्रारीत केला आहे. त्यावरुन आता सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांना अटक

परमबीर सिंग यांच्यासहित काही जणांवर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

8 वरिष्ठ पोलिस अधिका-यांवर गुन्हा

धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 8 वरिष्ठ पोलिस अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात डीसीपी अकबर पठाण यांचाही समावेश असून, त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. परमबीर सिंग यांच्यासोबतच इतरही अधिका-यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे दोघे परमबीर यांच्यासाठी खंडणी वसूल करत असल्याचा आरोप आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here