मनोरा, मॅजेस्टीक आमदार निवास आणि अजिंठा बंगल्याचे काम वेळेत पूर्ण करा; सभापती Prof. Ram Shinde यांचे निर्देश

सभापती प्रा. राम शिंदे (Prof. Ram Shinde) यांनी गुरुवार, ९ जानेवारीला विधान भवनात विधानमंडळ कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.

37

सध्या मनोरा आमदार निवास, मॅजेस्टीक आमदार निवास आणि अजिंठा बंगला यांच्या नुतनीकरणाचे काम सुरु आहे, ही कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे (Prof. Ram Shinde) यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.

सभापती प्रा. राम शिंदे (Prof. Ram Shinde) यांनी गुरुवार, ९ जानेवारीला विधान भवनात विधानमंडळ कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. त्यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-१ (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव-२ (कार्यभार) डॉ. विलास आठवले आणि विधानमंडळ सचिवालयातील सर्व अधिकारी वर्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा PM Narendra Modi यांचा सभापती राम शिंदे यांच्या आईसोबत मराठीतून संवाद)

मनोरा आमदार निवासाचे बांधकाम सुरू झाले असून त्यामध्ये सभागृह, वाचनालय, अद्ययावत वाहनतळ, सुसज्ज भोजन कक्ष, सदस्य आणि सहायकांसाठीची प्रशस्त निवास व्यवस्था उपलब्ध असणार आहे. मॅजेस्टीक आमदार निवासाचे देखील वारसा वास्तूवैभव कायम ठेऊन अतिशय देखणे असे नुतनीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रामुख्याने पीठासीन अधिकारी यांच्या निवासासाठी मलबार हिल येथे ‘अजिंठा’ इमारतीची सुसज्ज वास्तू उभारण्यात येत आहे. ही सर्व बांधकामे वेळेत पूर्ण व्हावीत, त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य ते नियोजन करावे, असे निर्देश सभापती प्रा. राम शिंदे (Prof. Ram Shinde) यांनी या बैठकीत दिले.

तसेच विधिमंडळ सभागृहात नव्याने सुरु करण्यात आलेल्या संगणक कार्यप्रणालीसंदर्भात आमदारांना सोप्या पद्धतीने अवगत करावे. सभागृह कामकाजात आमदारांचा सहभाग वाढावा यादृष्टीने सर्वोतपरी मार्गदर्शन करण्यात यावे, त्यांनी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असेही आदेश सभापती प्रा. राम शिंदे (Prof. Ram Shinde) यांनी या बैठकीत दिले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.