राष्ट्रवादी कॉंग्रेसची ‘सुपर १००’ ही संकल्पना आणि ॠतिक रोशनचा सुपर ३० चित्रपट…

91

२०१९ मध्ये ऋतिक रोशनचा सुपर ३० हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अगदी सामान्य कुटुंबातील मुलांचं ऑफिसर बनवण्याचं स्वप्न पूर्ण करणार्‍या एका प्रोफेसरची कथा गुंफण्यात आली आहे. चित्रपटातील एक संवाद खूप गाजला होता. ’अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा.’

‘सुपर १००’ ही संकल्पना

आता राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने राज्यातील विधानसभा मतदारसंघात ’सुपर १००’ ही संकल्पना राबवली जाणार आहे. यासाठी निरीक्षक यादी देखील जाहिर करण्यात आली आहे. आता येणार्‍या स्थानिक निवडणुकीच्या दृष्टीने ही संकल्पना राबवण्यात आलेली आहे. भारताची समस्या अशी आहे की भारतातले प्रादेशिक पक्ष हे स्थानिक पक्ष नसून कौटुंबिक पक्ष आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस देखील पवार कुटुंबाची वैयक्तिक मलामत्ता आहे असं पवार कुटुंबियांना वाटतं.

( हेही वाचा : ‘गेट वे ऑफ इंडिया’वर कार्यक्रमांसाठी मोजावे लागणार इतके पैसे )

म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाने काढलेली ’सुपर १००’ ही संकल्पना म्हणजे ’अब हकदार राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो पवार होगा.’ सुपर ३० आणि सुपर १०० मध्ये हा एवढा मोठ अंतर आहे. एकनाथ शिंदेंच्या उठावानंतर राज्यात भाजपाविरोधी पक्ष कोमात गेले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा साडेतील जिल्ह्यांपुरता मर्यादित असलेला पक्ष एक, दोन, अडीच जिल्ह्यांपुरता मर्यादित राहू नये यासाठी हा खटाटोप चाललेला आहे. अगदी खोलात गेलं तर आपल्या लक्षात येईल की हा खटाटोप पक्ष वाचवण्यासाठी नसून पवारांची खजगी मालमत्ता असलेला पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वाचवण्यासाठी चाललेला हा प्रयत्न आहे.

या सुपर १०० मोहिमेमुळे जनतेला कसलाच फायदा होणार नाही. राजाच्या मुलांना राजा करण्यासाठी चाललेला हा प्रयत्न आहे. या प्रयत्नांमध्ये जे खरोखरच राजा होण्यास पात्र आहेत ते डावलले जाणार आहेत. म्हणून जर सक्षम असलेल्या माणसाला राजा करायचे असेल तर सुपर १०० नव्हे, सुपर ३० ही संकल्पना राबवली पाहिजे. सुपर ३० या संकल्पनेच स्पष्ट संदेश आहे की, ’अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा.’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.