शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूची संकल्पना १९७३ मध्ये निश्चित झाली होती. मात्र त्यानंतर ४० वर्षांत यासाठी काहीच झाले नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले, त्यांनी काम करण्याची पद्धत बदलली, त्यातून विकासकामांना गती आली. या सेतूसाठी मंजुरी तातडीने मिळाल्या आणि या अटलसेतूचे काम सुरु झाले, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी हाणला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच ‘अटल सेतू’चे उद्घाटन केले. त्यानंतर, अटल सेतू वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
राज्याच्या बजेटमधून हा प्रकल्प केला असता, तर विलंब झाला असता. आम्ही मोदींना विनंती केली, त्यांनी जपानशी बोलून जायकाकडून कर्ज मिळवून दिले. त्यामुळे, हा प्रकल्प अतिशय गतीने पूर्ण होऊ शकला काही लोकांनी फ्लेमिंगोचा प्रश्न निर्माण केला. पण, आम्ही पर्यावरणाचे नियम पाळले आणि आज फ्लेमिंगोंची संख्या सुद्धा वाढते आहे, असेही फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी म्हटले. पहिल्यांदा मुंबई आणि एमएमआरला एकप्रकारचा रिंगरोड मिळाला आहे. पंतप्रधान मोदी नसते तर अटल सेतू कधीच होऊ शकला नसता. प्रथमच मुंबई आणि महानगर यांना जोडणारा प्रकल्प सुरु झाला आहे. आजपर्यंत मुंबई ही देशाला ताकद देणारी होती, आता रायगड तिसरी मुंबई देशाला ताकद देणार आहे. इथे वेगळे हब तयार होईल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) म्हणाले.
Join Our WhatsApp Community