बंगाल पोलिसांनी अंजनी पुत्र सेना, विश्व हिंदु परिषद आणि दुर्गावाहिनी या हिंदु संघटनांना हावडा येथे श्रीरामनवमीनिमित्त (Shri Ram Navami) मिरवणूक काढण्यास अनुमती नाकारल्यानंतर या संघटनांनी कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करतांना न्यायालयाने मिरवणुकीला (Shri Ram Navami) सशर्त परवानगी दिली.
न्यायालयाने अनुमती देतांना काही अटी घातल्या आहेत. यात हावड येथील जुन्या मार्गावर श्रीरामनवमीची (Shri Ram Navami) मिरवणूक काढता येईल; परंतु शस्त्रे घेऊन जाण्यास अनुमती दिली जाणार नाही. यासह दुचाकी फेरी आयोजित करता येणार नाही, तसेच मिरवणूक काढणार्यांना पोलिसांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल. हावडा येथे गेल्या १५ वर्षांपासून श्रीरामनवमीला (Shri Ram Navami) मिरवणूक काढण्याची परंपरा आहे; परंतु गेली २ वर्षे या मिरवणुकीत हिंसाचार झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी जी.टी. मार्गावर मिरवणुकीला अनुमती देण्यास नकार दिला. हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, प्रशासनाने सलग दुसर्या वर्षी मिरवणुकीवर (Shri Ram Navami) बंदी घातली आहे. राज्य सरकारला ‘जय श्रीराम’ घोषणेविषयी काही अडचण आहे का? तथापि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी श्रीरामनवमीच्या (Shri Ram Navami) वेळी शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले आहे की, सर्वांना पूजा करण्याचा अधिकार आहे; परंतु दंगली होऊ नयेत.
Join Our WhatsApp Community