‘हिंदुस्थान पोस्ट’च्या बातमीवर शिक्कामोर्तब; MNS कडून मुंबई शहराध्यक्ष पदाची घोषणा

455
MNS : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता पुन्हा संघटनात्मक पातळीवर जोर देण्यास सुरुवात केली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी मनसेने नवीन संघटनात्मक बदल आणि रचना रविवार, २३ मार्चला जाहीर केली. यामध्ये मनसेची आता केंद्रीय कार्यकारणी असणार असून पहिल्यांदाच मुंबईसाठी अध्यक्षपदाची (MNS Mumbai President) देखील नेमणूक करण्यात आली आहे.  (MNS)

(हेही वाचा – Online Gaming वर केंद्र सरकारचे निर्बंध ; 2,400 बँक खाती, 357 वेबसाइट केल्या ब्लॉक)

नुकत्याच झालेल्या एका बैठकीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नेत्यांना प्रमुख शहराच्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत. यामध्ये मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांची मुंबई शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यावर शाखा अध्यक्षांची जबाबदारी देण्यात आली असून, मुंबई विभाग अध्यक्षांवर नितीन सरदेसाई यांचं नियंत्रण असेल. तसेच केंद्रीय कार्यकारणीची जबाबदारी ही बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) आणि अविनाश अभ्यंकर यांच्यावर देण्यात आली आहे. मुंबई अध्यक्ष नियुक्त नंतर येत्या काही दिवसांत राज्यातही अशी नियूक्ती केली जाणार आहे. मुंबईतील विभाग अध्यक्षांच्या कामावर देखरेख ठेवून त्यांच्यात समन्वय राखण्याची जबाबदारी मुंबई अध्यक्षावर देण्यात येणार आहे.

(हिंदुस्थान पोस्टची बातमी – Raj Thackeray लवकरच नेमणार मनसेचा पहिला मुंबई अध्यक्ष!)

मुंबईतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक राज ठाकरे यांनी मंगळवारी १८ मार्च २०२५ या दिवशी आयोजित केली होती. या बैठकीला मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी मुंबई-ठाणे-पुण्यासाह काही शहराच्या जबाबदाऱ्या वाटून देण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यानुसार मुंबई अध्यक्ष पद, ठाणे, पुणे, नाशिक, यासह शहर-जिल्हा प्रमुखांची पदे निर्माण करण्याचे ठरवले आहे. अशा आशयाची बातमी प्रथम ‘हिंदुस्थान पोस्ट’ने दिली होती, ती या निवडीने खरी ठरली आहे.


(हेही  वाचा – वसई-विरारमधील अडीच हजार कुटुंबांचे पुनर्वसन होणार; मंत्री Uday Samant यांची ग्वाही)

माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले, रविवारी झालेल्या बैठकीत मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. तर कुलाबा ते माहीम आणि कुलाबा ते शीव या भागाची जबाबदारी यशवंत किल्लेदार यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच गोरेगावकडील भागाची जबाबदारी कुणाल माईणकर आणि पूर्वेकडच्या भागाची जबाबदारी योगेश सावंतांकडे देण्यात आली आहे. निवड झालेल्या नेत्यांनी नेमकं काय काय करायचं याबाबतची माहिती २ तारखेला सांगणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा –

 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.