पासपोर्ट जप्त करा, उद्धव ठाकरे ४ जूननंतर लंडनला जाणार; Nitesh Rane असे का म्हणाले?

202
पासपोर्ट जप्त करा, उद्धव ठाकरे ४ जूननंतर लंडनला जाणार; Nitesh Rane असे का म्हणाले?

लोकसभा २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या राज्यात पाचही टप्प्यातील निवडणूका सोमवारी समाप्त झाल्या आहेत. तर देशभरात सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील निवडणुकीचे मतदान अजून बाकी आहे. तर या सर्व मताचे ०४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, समाज मध्यमांवर ‘झाले इलेक्शन, जपा रिलेशन’ अशा आशयाचे पोस्ट दिसू लागले असले तरी राजकारणात काही अलबेल दिसत नाहीये. कणकवली विधानसभेचे भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर तिखट शब्दात प्रहार केला आहे. (Nitesh Rane) 

नितेश राणे म्हणाले की, राज्यात महायुती ४५ चा आकडा गाठेल हे निश्चित आहे. कारण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमधील रडगाणे पाहून पुन्हा मोदीच येणार आहेत, हे स्पष्ठ  झाले आहे. ०४ जून नंतर उद्धव ठाकरे लंडनला (Uddhav Thackeray London) पळून जाण्याच्या विचारात असून, आताच त्यांचे पासपोर्ट जप्त (Uddhav Thackeray’s passport confiscated) करा. असे विधान आमदार नितेश राणे यांनी केले.

(हेही वाचा – Milind Deora: उद्धव ठाकरेंमुळे मला पक्ष सोडावा लागला, मिलिंद देवरा यांनी असा आरोप का केला?)

दरम्यान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मतदानच्या दिवशी पत्रकार परिषद घेत मुंबईची निवडणूक प्रक्रियेत जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याचा आरोप केला होता. यावर नितेश राणे यांनी प्रतिउत्तर दिले. राणे म्हणाले की, संजय राऊत यांनी एकही निवडणूक लढवली नाही. त्यांना मतदान कसे मिळवायचे हे सुद्धा माहीत नाही. त्यानंतरही मतदान कसे मिळवायचे हे सांगत असतील तर लाजिरवाणी गोष्ट आहे. तसेच या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेचे मशाल (UBT Mashal) विजवून टाकली आहे. हे चित्र स्पष्ठ झाले आहे. भाजपाचे उमेदवार घासून नव्हे तर ठासून निवडून येतील. आणि येत्या ०४ जून रोजी आमचाच गुलाल उधलेळ असे नितेश राणे यांनी सांगितले. पुण्यातील रस्ते अपघाताप्रकरणी पोलिस यंत्रणा सतर्क आहे. हे महाविकास आघाडीचे सरकार नाही. मविआ सरकारमध्ये दिशा सालियन प्रकरणाचे पुरावे नष्ट करण्यात आले होते. तसा प्रकार या घटनेत होणार नाही, असेही नितेश राणे यावेळी बोलताना म्हणाले.  (Nitesh Rane)       

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.