Raigad पालकमंत्र्याचा वाद नव्या मुख्यमंत्र्यांच्या दरबारी!

52
Raigad पालकमंत्र्याचा वाद नव्या मुख्यमंत्र्यांच्या दरबारी!
  • खास प्रतिनिधी 

रायगड (Raigad) जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार भरत गोगावले गेली अडीच वर्षे मंत्रीपदासाठी गुढग्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यासाठी नवा कोट शिवल्याची कबुली त्यांनीच दिली आणि त्याची अनेकदा माध्यमांमध्ये चर्चाही होत असते.

गोगावले पुन्हा ‘वेटिंग’वर

रायगड (Raigad) जिल्ह्यात गोगावले यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या आदिती सुनील तटकरे यादेखील मंत्रीपदाच्या आणि पर्यायाने पालकमंत्री पदाच्या स्पर्धेत आहेत. अडीच वर्षांपूर्वी गोगावले यांना मंत्रीपदासाठी काही महिने ‘वेटिंग’वर राहावे लागले आणि वर्षभरातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा सरकारमध्ये समावेश झाला. शिंदे यांच्यासोबतच्या ४० आमदारांमध्ये गोगावले होते तशा पवार यांच्यासोबत आलेल्या ४० आमदारांमध्ये तटकरे आल्या. राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांना मंत्रिपदही मिळाले आणि त्यामुळे गोगावले पुन्हा ‘वेटिंग’वर गेले.

(हेही वाचा – प्राचीन पांडवकालिन जोगेश्वरी व अंधेरी गुंफाचे संवर्धन करण्याची Ravindra Waikar यांची मागणी)

रत्नागिरीचे सामंत रायगडचे पालक

दोघांच्या वादामुळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड (Raigad) जिल्ह्याचे पालकमंत्री पद रत्नागिरीच्या उदय सामंत यांच्याकडे सोपवून सुवर्णमध्य साधला. आता हा वाद नव्या मुख्यमंत्र्यांना त्रासदायक ठरू शकतो.

विधानसभेची मुदत संपत येईपर्यंत त्यांना मंत्रिपद मिळाले नाही अखेर आचारसंहिता लगाण्यापूर्वी शेवटच्या आठवड्यात त्यांची राज्य परिवहन महामंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.

(हेही वाचा – खातेवाटपावरून महायुतीत पेच; Uday Samant यांचा खुलासा)

वाद नव्या मुख्यमंत्र्यांकडे

गोगावले यांची आमदारकीची ही चौथी वेळ असून यापूर्वी ते २००९, २०१४, २०१९ आणि आता २०२४ विधानसभेवर निवडून गेले आहेत. नेहमी खांद्यावर छोटा टॉवेल दिसत असलेले गोगावले कोकणात ‘भरतशेठ’ या टोपणनावाने प्रसिद्ध आहेत.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही दोघे पुन्हा एकदा निवडून आले आणि मंत्री-पालक मंत्रीपदाचा वाद पुन्हा चर्चेला आला. गोगावले यांना यावेळी पूर्ण खात्री आहे की त्यांना मंत्री आणि पालकमंत्री पद मिळेल. आता नवे मुख्यमंत्री यावर काय तोडगा काढतात, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.