- प्रतिनिधी
विरोधी पक्षांच्या राष्ट्रीय स्तरावरील इंडी आघाडीचे (I.N.D.I. Alliance) नेतृत्व कुणी करावे, असा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. त्याविषयी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी भूमिका मांडली आहे. आघाडीच्या नेत्याची निवड सहमतीने व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतेच इंडी आघाडीच्या कामकाजाविषयी असमाधान व्यक्त केले. एवढेच नव्हे तर, संधी मिळाल्यास आघाडीचे नेतृत्व करण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. त्यानंतर आघाडीमधील घटक पक्ष नेतृत्वाविषयी वेगवेगळे सूर आळवू लागले आहेत.
(हेही वाचा – पक्षनिष्ठा सिद्ध करण्यासाठी Shiv Sena UBT च्या कार्यकर्त्यांची दर्ग्यात शपथ; राणे म्हणाले, मंदिर दिसले नाही का?…)
संबंधित मुद्यावर पत्रकारांनी येथील विमानतळावर तेजस्वी यांना प्रश्न विचारला. उत्तरादाखल त्यांनी ममतांकडे आघाडीचे नेतृत्व सोपवण्यास आमची कुठली हरकत नसल्याचे म्हटले. अर्थात, आमच्या आघाडीत अनेक ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे एकत्र बसून नेतृत्वाविषयी सर्वानुमते निर्णय घेण्याची गरज आहे. अद्याप त्यावर कुठला विचारविनिमय झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले. मोठा पक्ष म्हणून सध्या काँग्रेसच इंडी आघाडीचे अनौपचारिकपणे नेतृत्व करीत आहे. आघाडीची (I.N.D.I. Alliance) धुरा कुठल्या विशिष्ट नेत्याकडे सोपवण्यात आलेले नाही.
(हेही वाचा – BCCI Secretary : देवजीत सैकिया बीसीसीआयचे नवीन अंतरिम सचिव, जय शाह यांनी स्वीकारला आयसीसीचा कारभार)
इंडी आघाडीतील (I.N.D.I. Alliance) काही घटकपक्षांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे. तर, समाजवादी पार्टीने मात्र ममता यांना पाठिंबा दर्शवला आहे. समाजवादी पक्षाने ममता यांना इंडी आघाडीचे नेतृत्व करायचे असेल तर त्यांनी करावे, आमचा त्यावर अजिबात आक्षेप नाही अशी प्रतिक्रया सपाचे नेते उदयवीर सिंह यांनी दिली आहे. ममता बॅनर्जी यांचा पक्ष सातत्याने भाजपाचा विरोध करत आहे. त्यांचा पक्ष भाजपाविरोधात आक्रमकपणे लढत असल्याने आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याचे यावेळी उदयवीर सिंह म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community