वंदना बर्वे
लोकसभेच्या आगामी निवडणुकीला अद्याप थोडा उशीर असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि ‘इंडिया’ आघाडीत ‘कोंडी’वार सुरू झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांची कोंडी करण्यासाठी चालीवर चाली खेळत असल्याचे दिसून येत आहे. (I.N.D.I.A. Alliance)
सविस्तर वृत्त असे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अलिकडेच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून देशातील महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक पारित करून घेतले. सहा-सात महिन्यानंतर होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत महिला आरक्षण विधेयक निवडणुकीची दिशा बदलणारा असेल असे बोलले जात होते. (I.N.D.I.A. Alliance)
परंतु, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केल्यामुळे महिला आरक्षणाचा मुद्दा मागे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. थोडक्यात, सत्ताधारी भाजप आणि ‘इंडिया’ या २८ विरोधी पक्षांच्या आघाडीत एकमेकांना कोंडीत पकडण्यासाठी युध्द छेडले असल्याचे दिसून येत आहे. (I.N.D.I.A. Alliance)
पाच राज्यांतील विधानसभांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. यानंतर लोकसभेची निवडणूक होणे आहे. मोदी यांचे सरकार जातीनिहाय आकडेवारीच्या मुद्द्याला चोख प्रत्यूत्तर देण्याची तयारी करीत आहे, अशी चर्चा ऐकायला येऊ लागली आहे. आता सरकार विरोधकांना घेरण्यासाठी कोणता नवीन मुद्दा घेऊन येते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एक मात्र नक्की की, २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत कल्पनातील अशा मुद्द्यांच्या माध्यमातून एकमेकांना घेरण्याचा प्रयत्न सरकार आणि विरोधकांकडून होत असल्याचे बघायला मिळणार नाही. (I.N.D.I.A. Alliance)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community