MLA Disqualification Case : जेठमलानींच्या ‘या’ प्रश्नामुळे सुनील प्रभूंनी बदलली साक्ष

सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

162
MLA Disqualification Case : जेठमलानींच्या 'या' प्रश्नामुळे सुनील प्रभूंनी बदलली साक्ष
MLA Disqualification Case : जेठमलानींच्या 'या' प्रश्नामुळे सुनील प्रभूंनी बदलली साक्ष

शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवर (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्षांसमोर सध्या मॅरेथॉन सुनावणी सुरू आहे. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) वकिलांकडून उद्धव ठाकरेंच्या (Uddhav thackeray) सुनील प्रभूंवर (Sunil Prabhu) प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे. त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे देताना त्यांची भंबेरी उडताना दिसत आहे. बुधवारी सुनावणीदरम्यान एका प्रश्नावर गोंधळलेल्या सुनील प्रभूंनी दुसऱ्या सत्रात आपली साक्ष बदलली. (MLA Disqualification Case)

बुधवारी, दि. २९ नोव्हेंबर रोजी १२.३० वाजता शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवर (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणीला सुरुवात झाली. यावेळी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या वकिलांनी सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची उलटतपासणी घेतली. २२ जून २०२२ रोजी आपण जे पत्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठवले, ते कोणत्या माध्यमातून पाठवले, असा सवाल शिंदेंचे वकील महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांनी केला. त्यावर ‘व्हॉट्सएपच्या माध्यमातून’, असे उत्तर प्रभूंनी दिले. (MLA Disqualification Case)

त्यावर या पत्राची मूळ प्रत कुठे आहे, असा प्रतिप्रश्न करण्यात आला. मूळ प्रत रेकॉर्डवर आहे, असे प्रभूंनी सांगितले. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना अशी कोणतीही मूळ प्रत पाठवण्यात आली नसल्याचा दावा जेठमलानी यांनी केला. हा दावा खोटा असल्यास व्हॉट्सएपद्वारे पत्र पाठवल्याचे पुरावे सादर करा, असे जेठमलानी म्हणाले. (MLA Disqualification Case)

त्यावर गांगरून गेलेल्या प्रभूंनी दुसऱ्या सत्रात आपली साक्ष बदलण्याची विनंती केली. जेवणाच्या सुटीमध्ये मी पडताळणी केल्यानंतर हे पत्र ईमेलद्वारे पाठवल्याचे आढळले. त्यामुळे माझी साक्ष बदलण्यात यावी, असे प्रभू म्हणाले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांनी त्यांना तशी परवानगी दिली. (MLA Disqualification Case)

(हेही वाचा – MHADA Pune Mandal : ५८६३ सदनिकांच्या विक्रीसाठी ०५ डिसेंबर रोजी संगणकीय सोडत)

१ डिसेंबरपासून ठाकरेंच्या वकिलांना संधी

सध्याच्या वेळापत्रकानुसार ३० नोव्हेंबरपर्यंत एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) वकिलांना सुनील प्रभूंची (Sunil Prabhu) उलटसाक्ष घेता येईल. त्यानंतर १ ते ११ डिसेंबरपर्यंत उद्धव ठाकरेंचे (Uddhav thackeray) वकील महेश जेठमलानींची (Mahesh Jethmalani) उलटसाक्ष घेतील. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्षांना ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद संपल्यावर निकाल देण्यास २० ते २५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा सचिवालयाकडून सर्वोच्च न्यायालयाला वेळ वाढवून देण्याची विनंती केली जाणार आहे. (MLA Disqualification Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.