- प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीकडून महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यामध्ये लोकसभेला राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेला काँग्रेस (Congress) पक्ष अवघ्या १६ जागांवर येऊन अडकला. काँग्रेसच्या इतिहासातील हा अत्यंत खालचा आकडा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात राज्यात पाहावयास मिळाला. त्यामुळे याचे खापर राज्याचे प्रभारी तसेच सहप्रभारी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्षांवर फोडण्याची तयारी सुरू केली आहे.
(हेही वाचा – कुणीही बीड आणि परभणीचे पर्यटन करू नये; CM Devendra Fadnavis यांचा विरोधकांना इशारा)
वडेट्टीवारांनी पटोलेंवर डागली तोफ
लोकसभेच्या निवडणुकीतील विजयाचे श्रेय ज्यांनी घेतले त्यांच्यावरच विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचीही जबाबदारी येईल, असे सांगून माजी विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टार्गेट केले आहे. पराभवाची कारणे, चुका, नेतृत्वाविषयी मत जाणून घेण्यासाठी प्रभारी रमेश चेन्निथला नागपूरला आले होते. त्यांनी सर्वांसोबत चर्चा देखील केली होती. या चर्चेतून जो सूर निघाला, त्यानुसार पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील जागावाटपातील वाटाघाटीत शेवटच्या टप्प्यातील बैठकांची जबाबदारी पटोले यांच्याऐवजी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली होती. हा इतिहास पाहता काँग्रेस (Congress) पक्ष बाळासाहेब थोरात किंवा इतर कोणाकडेही प्रदेशाध्यक्षाची धुरा देऊ शकते. एकंदर पाहिलं गेलं तर सध्याच्या घडीला काँग्रेसमध्ये राज्यव्यापी नेतृत्वाचा अभाव दिसून येतो. जे काही बडे नेते आहेत ते त्यांच्या त्यांच्या जिल्हा किंवा विभागासाठी मर्यादित नेतृत्व पहावयास मिळते. यामध्ये कोल्हापुरातील सतेज बंटी पाटील, साताऱ्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सांगलीत विश्वजीत कदम तर नगर जिल्ह्यात बाळासाहेब विखे पाटील. विदर्भाचा विचार केला तर माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील संपूर्ण राज्यातील काँग्रेस जणांना पटतील आणि नेतृत्व करू शकतील असा प्रदेशाध्यक्ष पदाचा चेहरा आहे.
(हेही वाचा – Pandit Madan Mohan Malviya यांच्या जयंतीनिमित्त हिंदू महासभेकडून अभिवादन)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आता लक्ष्य
विधानसभा निवडणुकीतील पराभव पचवत काँग्रेसने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद-पंचायत समित्या, महापालिका व नगर पालिकांच्या निवडणुकांपूर्वी पक्षसंघटनेत नवसंजीवनी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस (Congress) प्रभारी रमेश चेन्निथला यांनी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community