- प्रतिनिधी
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनंतर आता काँग्रेसकडूनही स्वबळावर लढण्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेस (Congress) खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा आधार घेत स्वबळावर निवडणुका लढण्याबाबत सूचक विधान केले आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, “काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांचा आवाज ऐकणे आणि त्यांना संधी देणे ही पक्षाची जबाबदारी आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की, स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसने स्वबळावर लढावे. त्यांच्या मागणीनुसार आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ.”
गायकवाड यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. उबाठा शिवसेनेने आधीच स्वबळाचा नारा दिला आहे आणि काँग्रेसकडूनही असे संकेत आल्याने आघाडीतील एकजूटीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
(हेही वाचा – First Anniversary of Ram Mandir : श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त PM Modi यांनी दिल्या शुभेच्छा)
कार्यकर्त्यांचा आग्रह महत्त्वाचा
गायकवाड यांनी स्पष्ट केले की, “कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर निवडणुकीसाठी संधी हवी आहे. मोठ्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना नेहमीच संधी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या भावना लक्षात घेऊन स्थानिक निवडणुकांबाबत निर्णय घेतला जाईल.” (Congress)
(हेही वाचा – Veer Savarkar : राष्ट्रप्रेमींच्या उदंड प्रतिसादामुळे ‘स्वातंत्र्यवीर लाईट अँड साऊंड शो’चे ११ जानेवारीला २ सत्रांत प्रसारण)
महाविकास आघाडीत फूट ?
काँग्रेसच्या (Congress) स्वबळाच्या संकेतामुळे महाविकास आघाडीतील समन्वयावर परिणाम होईल का, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र राहून भाजपाविरोधात लढण्याची भूमिका घेतली होती. मात्र, सध्याच्या परिस्थितीत आघाडीतील प्रत्येक पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन स्वतंत्र निर्णय घेत असल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेनंतर राज्यातील राजकीय समीकरणे आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community