पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी इस्त्राईलवर हल्ला केल्यानंतर भारत सरकारने इस्रायलला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. देशभरातून या निर्णयाचे स्वागत झाले. असे असताना काँग्रेसने मात्र देशविरोधी भूमिका घेत पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे. (Israel Palestine Conflict)
काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ ठराव मंजूर करण्यात आला. “काँग्रेस इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये झालेल्या युद्धाबद्दल आणि हजारांहून अधिक लोकांच्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख आणि वेदना व्यक्त करते. काँग्रेस पॅलेस्टिनी नागरिकांना समर्थन दर्शवते. पॅलेस्टिनी लोकांच्या जमीन, स्वशासन, स्वाभिमान आणि सन्मानाने जगण्याच्या हक्कांसाठी दीर्घकालीन समर्थनाचा पुनरुच्चार काँग्रेस करते,” असे काँग्रेसने ठरावात म्हटले आहे. (Israel Palestine Conflict)
दरम्यान, गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्राईलवर हल्ला केल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलला पाठिंबा दर्शवला. शिवाय अमेरिकेसह इतर राष्ट्रांनीही इस्रायलला पाठिंबा दिला आहे. मात्र, काँग्रेसने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ ठराव मंजूर केल्याने त्यांचे दहशतवाद्यांना समर्थन आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Israel Palestine Conflict)
(हेही वाचा – Israel Palaestine conflict : संपूर्ण गाझा पट्टी इस्रायलच्या ताब्यात ,३ लाख सैनिक तैनात)
१ हजारहून अधिक मृत्युमुखी
पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबरला जमीन, हवाई आणि समुद्रातून ५ हजार रॉकेट इस्रायलवर डागली. इस्रायल या हल्ल्यासाठी तयार नसताना हमासने अचानक हल्ला चढवला. आता इस्रायल देखील हमासच्या या रक्तरंजित हल्ल्याला पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देत आहे. रॉकेट हल्ल्याने सुरू झालेल्या या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूचे १ हजारहून अधिक लोक मारले गेले आहेत. शिवाय २ हजारहून अधिक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Israel Palestine Conflict)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community