लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चहूबाजूंनी कोंडी झाल्यामुळे काँग्रेस (Congress) कमालीची संतापली आहे. सीबीआय, ईडी आणि इतर एजन्सीजचे जे अधिकारी चौकटीबाहेर जाऊन काम करीत आहेत. अशा अधिकाऱ्यांना सत्तांतरानंतर पाहुन घेऊ असा इशाराच राहुल गांधी यांनी दिला आहे.
(हेही वाचा – Eastern Freeway च्या पेडेस्टलमध्ये क्रॅक आणि बेअरिंग खराब, दुरुस्तीचे काम लवकरच)
काँग्रेसची राजकीय आणि आर्थिक कोंडी :
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काँग्रेस (Congress) पक्षाकडे तब्बल १८२३.३ कोटींची वसुली काढली. तशी नोटीस पक्षाला पाठवली. काँग्रेसने इन्कम टॅक्स कसा आणि केव्हा थकवला.., ती रक्कम किती होती.., याचे सगळे तपशील त्या नोटीशीमध्ये दिले. त्यामुळे काँग्रेसची राजकीय आणि आर्थिक कोंडी झाली. त्या मुद्द्यावर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश आणि खजिनदार अजय माकन यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन इन्कम टॅक्स डिपार्टमेंट वर शरसंधान साधले होते, पण त्याचबरोबर काँग्रेसला जर केवळ १४ लाखांच्या थकबाकी साठी १८२३ कोटी रुपयांची दंड आणि व्याजाची नोटीस काढणार असाल, तर भाजपाने ४२ कोटी रुपये थकबाकी ठेवली आहे. त्यामुळे त्यांना तर ४६०० कोटी रुपयांची दंड आणि व्याजाची नोटीस पाठवली पाहिजे. पण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने तसे केले नाही. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पक्षपाती आहे, असा आरोप काँग्रेसने (Congress) केला होता.
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : नाशिकच्या बदल्यात राष्ट्रवादीला राज्यसभेचा पर्याय ?)
काँग्रेसचा तिळपापड :
परंतु, शुक्रवारी (२९ मार्च) राहुल गांधींनी (Congress) संपूर्ण संताप ईडी आणि सीबीआयवर काढला. या दोन्ही तपास संस्थांनी कायद्याच्या चौकटीत राहून योग्य काम केले असते, तर त्यांना काही प्रॉब्लेम आला नसता, पण या संस्था भाजपा सरकारच्या बटीक असल्यासारखे काम करतात. या संस्थांमधल्या अधिकाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, भाजपाचे सरकार केंद्रात कायमचे राहणार नाही. त्यामुळे मी याची गॅरंटी देतो की, केंद्रातले सरकार बदलले की ईडी आणि सीबीआयच्या दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध आमचे केंद्र सरकार अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करेल, अशा शब्दांत राहुल गांधींनी (Congress) धमकी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community