पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणाच्या विरोधात काँग्रेस राज्यातील भाजपाच्या नेत्यांच्या घरावर मोर्चे काढत आहेत, निदर्शने करत आहेत. मात्र प्रत्येक वेळी भाजपाच्या आक्रमक पवित्र्यामुळे काँग्रेसचे आंदोलन अपयशी ठरत आहे. तरीही भाजपचे खासदार मनोज कोटक यांच्या घरावर काँग्रेसने मोर्चा काढला, मात्र यावेळीही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मनोज कोटक यांच्या घरासमोर जोरदार विरोध केला, त्यामुळे या आंदोलनाचाही फियास्को झाला.
काँग्रेसच्या नौटंकीचा शेवट मुंबईत करु
पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याविरोधात सोमवारी भाजपा खासदार मनोज कोटक यांच्या घराबाहेर मुंबई काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पुन्हा काँग्रेस विरुद्ध भाजपा संघर्ष मुंबईत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्याला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा भाजपाने दिला आहे. काँग्रेसच्या आंदोलनाआधीच भाजपा कार्यकर्त्यांकडून खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर शक्तीप्रदर्शन करण्यात आले. खासदार मनोज कोटक यांनी काँग्रेसचे कार्यकर्ते इथे आले नाहीत तर आमचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयात जातील, असा इशारा दिला आहे. काँग्रेसने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर येणारी भाषा केल्यानंतर त्यादिवशी सुद्धा सांगितले होते की, भाजपा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. काँग्रेसला भाड्याने माणसे आणावी लागत आहेत. आज देखील आमच्या आमदारांनी ठरवले आहे की, १२ वाजेपर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते इथे आले नाहीत, तर आमचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयात जातील. ही नौटंकी त्यांनी सुरु केली आहे. त्याचा शेवट आम्ही मुंबईत करु, असा इशारा खासदार मनोट कोटक यांनी दिला आहे.
(हेही वाचा कर्नाटकात कलम 144 लागू, पुन्हा शाळा- काॅलेज बंद! काय आहे कारण!)
Join Our WhatsApp Community