पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या विधानानंतर काॅंग्रेस आक्रमक झालं आहे. नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसमुळे कोरोना पसरल्याचं विधान केलं होतं. आता याचाच विरोध म्हणून काॅंग्रेसने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. पण त्यापूर्वीच काही काॅंग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच, याचा विरोध म्हणून भाजपनेही आम्ही आमच्या नेत्याचे रक्षण करु, असं म्हणत सागर या फडणविसांच्या निवासस्थानाकडे कूच केली आहे.
एकमेकांवर टीकास्त्र
भाजप आणि काॅंग्रेसच्या या आंदोलनामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण पेटले आहे आणि अनेक नेते एकमेकांवर टीका करत आहेत. थोडक्यात महाराष्ट्रात खडाजंगी रंगली आहे. घोषणाबाजी करत या आंदोलनाला तीव्र रुप देण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने सुरु आहे.
( हेही वाचा :धक्कादायक! हिंदू मुलींना फसवण्यासाठी मुसलमानांकडून व्हॅलेंटाईन पार्टीचे आयोजन )
माफी मागणार नाही
भाजप हे महाराष्ट्रद्रोही असल्याचं काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. गनिमी काव्याने आम्ही सागर बंगल्यावर पोहोचू, असंदेखील नाना पटोले यांनी म्हटले. तसेच, भाजपाचे नेते राम जोशी यांनी पंतप्रधान मोदी यांनी केलेले वक्तव्य हे योग्य आणि खरे असल्याचे म्हटले आहे. राजकीय वर्तुळात मोदींच्या वक्तव्यानंतर, पडसाद उमटूनही भाजप मात्र आपल्या माफी न मागण्याच्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे आता जोपर्यंत भाजप माफी मागत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.
पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
बाबुलनाथ परिसरात भाजपाकडून आंदोलन केलं जातं आहे. या आंदोलनातील भाजपा कार्यकर्त्यांनाही पोलीस महिला दलाकडून ताब्यात घेतलं जात आहे. त्यामुळे आता पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे.
Join Our WhatsApp Community