नागपूरात काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये का झाला राडा! वाचा…

136

नागपुरमध्ये केंद्रीय नितीन गडकरी यांच्या घराबाहेर गुरूवारी आंदोलन सुरू आहे. यावेळी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये आमने-सामने आले आहेत. कार्यकर्त्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आल्याने गडकरींच्या घराबाहेर पोलीसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. नितीन गडकरींच्या घरासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचं हे आंदोलन करण्यात येत आहे. तर यावेळीच गडकरींच्या घराखाली भाजपचेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील जमा झाल्याने तणाव वाढला आहे.

गडकरींच्या घराबाहेर काँग्रेस-भाजप आमने सामने

काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. जबरदस्तीकरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना माघारी फिरवण्यात आला. मोदींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने गडकरींच्या घराबाहेर गुरूवारी १२ वाजता आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशारानुसार, काँग्रेसचे कार्यकर्ते ठरलेल्या वेळी एकत्र जमले. काँग्रेसचे कार्यकर्ते गडकरींच्या घराबाहेर एकत्र जमल्याने राडा करतील म्हणून भाजपचे कार्यकर्ते यापूर्वीच पोहोचले होते.

(हेही वाचा – हिजाब प्रकरणाचे दुसऱ्या दिवशीही महाराष्ट्रात उमटले पडसाद )

काय आहे प्रकरण

कोरोनाच्या वाढलेल्या संसर्गासाठी महाराष्ट्र जबाबादार असल्याचे वक्तव्य करणाऱ्या पंतप्रधान मोदींविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. मोदी यांनी महाराष्ट्राने देशात कोरोना पसरविल्याचा आरोप केला होता. महाराष्ट्राने कामगारांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठविले आणि देशात कोरोना पसरला, असा आरोप मोदी यांनी संसदेत केला होता. त्यानंतर नाना पटोले यांनी भाजपच्या कार्यालयांसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिली. आंदोलनानंतर नितीन गडकरी यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला होता. या इशाऱ्यानुसार, हा राडा झाल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.