काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पसंती आदित्य ठाकरेंनाच!

एकाबाजुला शिवसेनेच्या नगरसेवकांना आदित्य ठाकरेंची वेळ मिळत नाही आणि दुसरीकडे इतर पक्षांच्या नगरसेवकांना आदित्य ठाकरे वेळ देत असल्याने एकप्रकारे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

राज्यातील सरकार स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले असले, तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांच्या कार्यक्रमांमध्ये शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे जातीने हजेरी लावताना दिसत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांकडून आदित्य ठाकरेंना प्रमुख मान्यवर म्हणून निमंत्रित केले जाते आणि आदित्य ठाकरेही इतर पक्षांच्या नगरसेवकांच्या निमंत्रणाचा मान राखून त्यांच्या कार्यक्रमांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे उपस्थित राहून उद्घाटनाच्या सोहळ्यात हजेरी लावतात. त्यामुळे स्वपक्षाच्या वाढीबरोबर आदित्य ठाकरे हे इतर मित्र पक्षांचीही तेवढीच विशेष काळजी आपल्या प्रगल्भ नेतृत्वाची चुणूक दाखवून देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पसंती ही आदित्य ठाकरेंनाच असल्याचे दिसून येत आहे.

भाई जगताप कुठेच नव्हते!

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शीव कोळीवाडा येथील महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या प्रयत्नाने सुरु झालेल्या कोविड लसीकरण केंद्राचे लोकार्पण पार पडले. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याहस्ते या केंद्राची रिबीन कापून याचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करण्यात आले. विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या पक्षाचे मंत्री बाळासाहेब थोरात यांना निमंत्रण देतानाच आदित्य ठाकरे यांनाही निमंत्रित केले. राजा यांचे निमंत्रण आदित्य ठाकरेंनी स्वीकारुन व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे त्यात सहभाग नोंदवला. या लसीकरण केंद्रांमध्ये तीन दिवस विभागातील जनतेला प्रत्यक्ष सहभागी होवून लसीकरण करता येईल, तर तीन दिवस कोविन अॅपवर नेांदणाी करूनच लसीकरण करता येईल. त्यामुळे हे लसीकरण केंद्र विभागातील जनतेला खऱ्याअर्थाने फायदेशीर ठरणारे आहे. एकाबाजुला या कार्यक्रमाचे उद्घाटन आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून करत असताना दुसरीकडे काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष भाई जगताप तसेच अन्य पदाधिकारी या कार्यक्रमात कुठेही दिसले नाही.

सेनेच्या नगरसेवकांना आदित्य वेळ देत नाहीत!

काँग्रेस नगरसेवक असलेले विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या कार्यक्रमात हजेरी लावणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी विक्रोळी गोदरेज येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांच्या प्रयत्नाने सुरु केलेल्या कोविड सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमातही हजेरी लावली होती. घाटकोपरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक व महापालिका गटनेत्या राखी जाधव यांच्या प्रयत्नातून गोदरेज कम्युनिटी हॉलमध्ये २५ आयसीयू बेड आणि ७५ ऑक्सिजन बेड्स क्षमतेचे कोविड सेंटर बनण्यात आले. या सेंटरचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपनगराचे पालकमंत्री व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते एप्रिल महिन्यात पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी प्रथम उपस्थिती लावली होती. एकाबाजुला शिवसेनेच्या नगरसेवकांना आदित्य ठाकरेंची वेळ मिळत नाही आणि दुसरीकडे इतर पक्षांच्या नगरसेवकांना आदित्य ठाकरे वेळ देत असल्याने एकप्रकारे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

(हेही वाचा :जोगेश्वरीत नवीन डॉप्लर रडार; हवामानाचा आणखी अचूक अंदाज येणार!  )

आदित्य यांची इथेही हजेरी!

काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज जामसूतकर यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस नगरसेविका सोनम मनोज जामसूतकर यांच्या प्रयत्नातून माझगाव लव्हलेन खिलाफत हाऊसजवळ सुरु करण्यात आलेल्या भायखळा येथील लसीकरण केंद्राच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावत याचे उद्घाटन केले. त्यानंतर खासदार अरविंद सावंत यांच्याहस्ते याचे औपचारिकक उद्घाटन पार पडले. या केंद्राच्या लोकार्पण सोह‌ळ्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनीही या केंद्राला भेट दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here