MVA मध्ये शिवसेना उबाठा एकाकी!

82
MVA मध्ये शिवसेना उबाठा एकाकी!
  • खास प्रतिनिधी 

‘राजकारणामध्ये संवाद ठेवला पाहिजे, या दांभिक गोष्टींवर आमचा विश्वास नाही,’ या शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांच्या विधानावर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (शप) शिवसेना उबाठाला एकाकी पाडले. (MVA)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शनिवारी २२ मार्च २०२५ या दिवशी पुण्यात बैठक झाली, यावरून शिवसेना उबाठा नेते संजय राऊत चांगलेच संतापले. त्यांनी त्यांची तडफड माध्यमांसमोर व्यक्त करत राजकारणामध्ये संवाद ठेवला पाहिजे, या दांभिक गोष्टींवर आमचा विश्वास नाही, असे म्हणत शरद पवार यांनाही टोला हाणला. (MVA)

(हेही वाचा – Pakistani spy : पाकिस्तानी गुप्तहेराची 17 वर्षांची शिक्षा पूर्ण ; आता पुढे काय ?)

काहीतरी राळ उठवणं योग्य नाही

मात्र यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उबाठालाच उलटे सुनावले. मला वाटतं कोणी भेटलं, काही चर्चा केली तर त्यात गैर काय. मी पण भेटून आलो एकनाथ शिंदे यांना. म्हणजे काय ती राजकीय चर्चा समजायची? मला आता अजितदादांकडे काम आहे, मी भेटणार आहे त्यांना सोमवारी. म्हणजे काय आम्ही भेटायचंच नाही सरकारमधील मंत्र्यांना? काही गोष्टी बोलायच्या असतात ज्या सांगळ्यांसामोर बोलू शकत नाही. केली असेल चर्चा. यावरून काहीतरी राळ उठवणं आणि विरोधकांना कमजोर करणं योग्य नाही, असं माझं मत आहे,” असे सांगून अप्रत्यक्ष उबाठाच्या भूमिकेला विरोध केला. (MVA)

(हेही वाचा – Ajit Pawar आणि Jayant Patil यांच्या भेटीमुळे Sanjay Raut यांची तडफड!)

शिवसेनेचे कोण माहीत नाही

शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी (शप) खासदार सुप्रिया सुळे यांनीही संजय राऊत यांना तोंडघशी पाडले. त्या म्हणाल्या, “वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये भेटणं काही नवीन नाही. सगळेच लोक सगळ्याच पक्षाच्या लोकाना भेटतात. त्याच्यात काही फक्त राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी असं नाही, त्यात काँग्रेस आहे, भाजपा आहे. शिवसेनेचे कोण आहेत मला माहीत नाही, कोण पदाधिकारी किंवा सचिव. हे अनेक वर्षे सुरू आहे. आमचं सामाजिक कार्य आणि राजकारण या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत,” असा टोला सुळे यांनी राऊत यांना लगावला. (MVA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.