ओडिशाच्या पुरी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या (Congress) उमेदवार सुचरिता मोहंती यांनी त्यांना पक्षाने दिलेले तिकीट परत केले आहे. तसे पत्र त्यांनी पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना लिहिले आहे. निवडणूक लढवण्यासाठी निधी न मिळाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
सुचरिता यांनी पत्रात लिहिले की, मी एक व्यावसायिक पत्रकार होते, 10 वर्षांपूर्वी राजकारणात आले होते. पुरी येथील प्रचारात मी माझे सर्वस्व दिले. मी सार्वजनिक देणगीचाही प्रयत्न केला, पण यश मिळालं नाही. काँग्रेस (Congress) पक्षाच्या निधीशिवाय निवडणूक प्रचार शक्य होणार नाही. माझे तिकीट परत करण्याचे पहिले कारण म्हणजे पक्ष मला निधी देऊ शकला नाही. दुसरे म्हणजे, राज्यातील 7 विधानसभा मतदारसंघांतील काही जागांवर पक्षाने विजयी नेत्यांना तिकीट देण्याऐवजी कमकुवत उमेदवार उभे केले आहेत. मी अशा प्रकारे निवडणूक लढवू शकत नाही.
(हेही वाचा Aaditya Uddhav Thackeray : ठाकरे पिता-पुत्राची सावरकर उच्चारताना उडाली भंबेरी)
भाजपाचे संबित पात्रा उमेदवार
पुरी मतदारसंघातून भाजपाचे संबित पात्रा आणि बिजू जनता दलाचे (बीजेडी) अरुप पटनायक यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत होत्या. अरुप पटनायक हे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत. दोघांनीही अर्ज दाखल केले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने सुचरिता यांना उमेदवारी दिली होती. ओडिशामध्ये 13, 20, 25 मे आणि 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीसह चार टप्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. पुरी लोकसभा आणि राज्यातील 7 विधानसभेच्या जागांसाठी 25 मे रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 6 मे आहे. (Congress)
Join Our WhatsApp Community