पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर पक्षाच्या पराभवाची कारणे आणि भविष्यातील कृतीबाबत रविवारी काँग्रेस कार्यकारिणी बैठक (सीडब्ल्यूसी) या काँग्रेसची सर्वोच्च धोरण ठरविणारी संस्थेची चर्चा झाली. महत्त्वपूर्ण बैठकीच्या एक दिवसआधी गांधी कुटुंबीय पक्षाच्या पदांचा राजीनामा देऊ शकतात, अशा चर्चा सुरू होत्या. दरम्यान, या बैठकीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाला वाटले तर माझ्यासह राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आम्ही राजीनामा देण्यास तयार असल्याचे म्हटले. मात्र, सोनिया गांधी यांचा राजीनामा देण्याची ऑफर काँग्रेस कार्यकारिणीने फेटाळल्याची माहिती समोर येत आहे.
(हेही वाचा – ‘या’ देशाने एकाच दिवशी दिली 81 जणांना फाशी! काय आहे कारण?)
कांग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी जी की अध्यक्षता में कांग्रेस कार्यसमिति की बैठक pic.twitter.com/6J13RUHLHC
— Congress (@INCIndia) March 13, 2022
काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर पक्षाच्या G-२३ बैठक
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, गेल्या काही काळापासून सोनिया गांधी सक्रियपणे प्रचार करीत नाहीत, प्रियांका गांधी वाड्रा यांच्याशिवाय राहुल गांधी हे काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत. तसेच पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये भाऊ-बहीण जोडीचा मोठा वाटा असतो. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर पक्षाच्या G-२३ गटातील अनेक नेत्यांची शुक्रवारी बैठक झाली. ज्यामध्ये भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला कपिल सिब्बल, आनंद शर्मा आणि मनीष तिवारी उपस्थित होते.
राहुल गांधींना पक्षाध्यक्ष बनवण्याची मागणी
काँग्रेसच्या काही नेते व कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद द्या, अशी मागणी केल्याचे समजत आहे. पक्षाच्या मुख्यालयाजवळ राहुल गांधींच्या अध्यक्षपदी नियुक्तीच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्षांच्या भूमिकेत पहायचे आहे, असेही मत यावेळी काही नेत्यांनी व्यक्त केले. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गेहलोत म्हणाले की, आजच्या काळात राहुल गांधी हे एकमेव नेते आहेत, जे पूर्ण ताकदीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सामना करीत आहेत.
Join Our WhatsApp Community