Congress CWC Meeting : काँग्रेसच्या पोस्टरवर भारताच्या नकाशातून पीओके गायब; काश्मीरशी पुन्हा केला द्रोह

187
Congress CWC Meeting : काँग्रेसच्या पोस्टरवर भारताच्या नकाशातून पीओके गायब; काश्मीरशी पुन्हा केला द्रोह
Congress CWC Meeting : काँग्रेसच्या पोस्टरवर भारताच्या नकाशातून पीओके गायब; काश्मीरशी पुन्हा केला द्रोह

काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक (Congress CWC Meeting) कर्नाटकातील बेळगावी गुरुवारी (२६ डिसेंबर) होत आहे. बैठकीपूर्वी कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये पोस्टर लावले. ज्यामध्ये भारताचा चुकीचा नकाशा दाखवला आहे. भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय (Amit Malviya) यांनी सोशल मीडियावर चुकीच्या नकाशाचे छायाचित्र पोस्ट केले आहे. (Congress CWC Meeting)

 

बेळगावमध्ये होत असलेल्या अधिवेशनानिमित्ताने कार्यकर्त्यांकडून बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर जम्मू काश्मीर वगळण्यात आलेला भारताचा नकाशा छापलेला होता. जम्मू आणि काश्मीर भारताचा भाग नसल्याचा नकाशा लावल्याचा मुद्दा भाजपाने उचलून धरत काँग्रेसवर टीकास्त्र डागलं आहे. (Congress CWC Meeting)

हेही वाचा-Gujrat Accident : गुजरातमध्ये टायर फुटून दोन ट्रकची समोरासमोर धडक, स्फोटात 2 ठार, 3 जखमी

भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) म्हणाले, आज हृदय दुखावणारे चित्र समोर आले आहे. भाजपा कर्नाटकने एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये असे दिसून येते की, बेळगावी येथे काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी भारताच्या नकाशात पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीनचा समावेश केलेला नाही. यापूर्वीही त्यांनी असे प्रकार केले आहेत. भारत तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींशी काँग्रेसचा संबंध असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. (Congress CWC Meeting)

हेही वाचा-ईव्हीएम यंत्रावरच चार निवडणुका जिंकले; Supriya Sule यांनी मांडली मविआच्या नेत्यांपेक्षा वेगळी भूमिका

या मुद्द्यावरून भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला (Shahzad Poonawalla) यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. “काँग्रेस पक्ष भारत जोडो म्हणतो, पण बेळगाव अधिवेशनात त्यांनी भारताचा जो नकाशा लावला, त्यात छेडछाड केली गेली आहे. या नकाशात जम्मू आणि काश्मिरला पाकिस्तानचा आणि अक्साई चीनला चीनचा भाग दाखवला आहे. हा नकाशा अधिवेशनात लावण्यातून हेच दिसतं की, काँग्रेसची मानसिकता नेहमी देशाचे तुकडे करण्याची राहिलेली आहे.” अशी टीका पूनावाला यांनी केली आहे. (Congress CWC Meeting)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.