‘भारत जोडो’मध्ये सहभागी व्हा, त्याबदल्यात दसरा मेळाव्यात सहकार्य करू; काँग्रेसचा ‘उद्धवसेने’ला प्रस्ताव

दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी उद्धव ठाकरेंची धडपड

138

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी व्हा, त्याबदल्यात दसरा मेळाव्याला सहकार्य करू, असा प्रस्ताव मुंबई काँग्रेसने उद्धवसेनेला दिला आहे. शिवसेनेतील बहुतांश पदाधिकाऱ्यांचा याला विरोध असला, तरी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची आघाडी टिकवण्यासाठी उद्धव आणि आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी होण्याबाबत सकारात्मक असल्याचे कळते.

दसरा मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी धडपड

एकनाथ शिंदे गटाच्या उठावानंतर पक्ष संघटना टिकवण्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर निर्माण झाले आहे. दुसरीकडे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एकनाथ शिंदे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असल्याने, किमान त्या तोलामोलाची गर्दी जमवण्यासाठी ठाकरेंनी धडपड सुरू केली आहे. पक्षात उरलेले नेते स्वबळावर इतकी गर्दी जमवतील याची खात्री नसल्याने त्यांनी मित्रपक्षांकडे मदत मागण्यास सुरुवात केली आहे. मात्र, काँग्रेसने त्यासाठी काही अटी-शर्थी घातल्या असून, भारत जोडो यात्रेत शिवसेना सहभागी झाली, तरच त्यांना दसरा मेळाव्याकरिता मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे कळते.

(हेही वाचा PFI वर बंदी घालण्यामागची केंद्र सरकारने सांगितली ‘ही’ कारणं)

काँग्रेसचा प्रस्ताव असा…

२ ऑक्टोबरला काँग्रेस मुंबईत ‘भारत जोडो’ यात्रा काढणार आहे. पण मुंबईतील त्यांची ताकद बघता त्याला फारसा प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शिवसेनेने या यात्रेत सहभागी व्हावे, असा प्रस्ताव मुंबई काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. त्या बदल्यात दसरा मेळाव्याला सहकार्य केले जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.