काँग्रेसने केला मंगेशकर कुटुंबीयांवर अन्याय… मोदींचा गंभीर आरोप

मंगेशकर कुटुंबासोबत काँग्रेसने काय केलं याची माहिती मोदींनी सभागृहात कथन केली.

86

संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. सोमवारी लोकसभेत मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला, त्यानंतर त्यांनी मंगळवारी राज्यसभेतही काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसमुळे देशाचे फार मोठे नुकसान झाले हे सांगतानाच त्यांनी काँग्रेसने केलेल्या अन्यायांचा पाढा वाचून दाखवला. त्यावेळी मंगेशकर कुटुंबासोबत काँग्रेसने काय केलं याची माहिती मोदींनी सभागृहात कथन केली.

(हेही वाचाः गांधीच्या इच्छेनुसार काँग्रेस विसर्जित झाली असती, तर…पंतप्रधान मोदींचा घणाघात)

…म्हणून मंगेशकरांना नोकरीवर काढण्यात आले 

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे आज संपूर्ण देश दुःखी आहे. मंगेशकर कुटुंब हे मुळचे गोव्याचे. या कुटुंबावर काँग्रेसने कसा अन्याय केला हे देशाला कळायला हवं. लता दिदींचे धाकटे बंधू पं. हृदयनाथ मंगेशकर हे त्यावेळी ऑल इंडिया रेडिओमध्ये काम करत होते. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं देशभक्तीपर गीत संगीतबद्ध करुन ऑल इंडिया रेडिओवर त्याचे सादरीकरण केले. तेव्हा त्यांना ऑल इंडिया रेडिओमधून काढून टाकण्यात आले. हा त्यांचा गुन्हा झाला का, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

(हेही वाचाः नेहरूंनी स्वत:ची प्रतिमा जपण्यासाठी गोव्याला पारतंत्र्यात ठेवले!)

हेच तुमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य?

पं. हृदयनाथ मंगेशकरांनी याबाबत एका मुलाखतीत सांगितले आहे. जेव्हा हृदयनाथ मंगेशकरांनी सावरकरांना त्यांचं गीत संगीतबद्ध करण्याची कल्पना बोलून दाखवली तेव्हा, “तुम्हाला तुरुंगात जायचं आहे का?”, असा सवाल त्यांना सावरकरांनी केला होता. हे गाणं प्रसारित झाल्यानंतर केवळ आठ दिवसांत हृदयनाथ मंगेशकरांना ऑल इंडिया रेडिओमधून काढून टाकण्यात आले, असे मोदींनी सांगितले. हेच तुमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का, असा सवालही मोदींनी काँग्रेसला केला आहे.

(हेही वाचाः मोदी म्हणतात… देशभरात कोरोना पसरवण्यात ‘या’ पक्षाचा ‘हात’!)

काँग्रेसमुळे देशात कोरोनाचा प्रसार

सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. कोरोना काळात काँग्रेसने मर्यादा ओलांडली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत देश नियमांचे पालन करत असताना, महाराष्ट्र काँग्रेसने परप्रांतियांना स्थलांतर करण्यास भाग पाडले. मोफत तिकीटं देऊन लोकांना मुंबईहून यूपी-बिहारला पाठवले. त्यामुळे देशभरात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार आहे, असा हल्लाबोल मोदींनी काँग्रेसवर केला होता.

(हेही वाचाः सुप्रिया सुळे म्हणाल्या… मोदीजी हैरान हूँ मैं!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.