PM Narendra Modi : काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा, संविधानाचा अवमान केला  

जाहीर सभेत काँग्रेसवर जोरदार हल्ला ; विकासविरोधी काँग्रेसने भाषा, जातीपातीच्या आधारावर देश तोडण्याचे कुटील कारस्थान रचले

226
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा, संविधानाचा अवमान केला 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. Babasaheb Aambedkar) लोकसभा निवडणुकीत (Lok sabha Election) पराभव घडवून आणणाऱ्या काँग्रेसने भारतीय संविधानाचा अनेकदा अवमान केला आहे. आणीबाणी लादून संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला शिक्षा करा, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाडमेर (Baadmer) (राजस्थान) (Rajasthan) येथे झालेल्या प्रचंड जाहीर सभेत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. विकासविरोधी काँग्रेसने भाषा, जातीपातीच्या आधारावर देश तोडण्याचे कुटील कारस्थान रचले आहे असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानातील सर्व जागी भाजपा उमेदवार विजयी करण्याचे आवाहन जनतेला केले. (Pm Narendra Modi)

(हेही वाचा –  मिठी नदीच्या कामाच्या SIT चौकशीचे स्वागत; महापालिका आणि एमएमआरडीए दोन्हीही अडचणीत)

काँग्रेसने दिलेली आश्वासने आत्यंतिक द्वेषाने भरलेली

पंतप्रधान मोदी म्हणाले की, निवडणुका आल्या की संविधानाच्या नावाखाली खोटे बोलणे ही इंडी आघाडीतील सर्व घटक पक्षांना सवय झाली आहे. आंबेडकरांना भारतरत्न मिळू दिले नाही. काँग्रेसने देशात आणीबाणी लादून राज्यघटना नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आज हेच काँग्रेस नेते मोदींना शिव्याशाप देण्यासाठी संविधानाच्या नावाखाली खोटा प्रचार करत आहेत. डॉ. आंबेडकरांचा सन्मान करण्यासाठी मोदी सरकारने पहिल्यांदा देशात संविधान दिन साजरा करायला सुरुवात केली. बाबासाहेबांशी संबंधित पंचतीर्थांचा विकास केला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात स्पष्टपणे दिसून येते की, काँग्रेसने दिलेली आश्वासने आत्यंतिक द्वेषाने भरलेली आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगचा प्रभाव दिसून येतो. इंडी आघाडीत समाविष्ट असलेल्या आणखी एका पक्षाने देशाविरोधात अत्यंत धोकादायक घोषणा केल्या आहेत. (Pm Narendra Modi)

(हेही वाचा – Chitra Wagh : राजकारणासाठी रामदास तडस यांच्या सुनेचा वापर; चित्रा वाघ यांचा आरोप)

पंतप्रधान मोदींची विकासकामे  

सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देशातील ४ कोटी गरीबांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे मिळाली आहेत, त्यापैकी १ लाख ७५ हजार गरीबांना बाडमेरमध्येही कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत. भाजपा (BJP) सरकार देशाच्या शेवटच्या सीमेपर्यंत रस्ते आणि महामार्ग बांधत आहे. भाजपा सरकारने बाडमेरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले असून आज सीमावर्ती बाडमेरमध्ये ७२ हजार कोटी रुपये खर्चून बांधलेली रिफायनरी सुरू होणार आहे. (Pm Narendra Modi)

(हेही वाचा – Prakash Ambedkar यांनी तुषार गांधींचा घेतला समाचार

काँग्रेसने जाणीवपूर्वक सीमावर्ती जिल्हे व गावे विकासापासून वंचित ठेवले

काँग्रेसची (Congress) विचारसरणी विकास विरोधी आहे. हे लोक देशाच्या सीमावर्ती गावांना देशाची शेवटची गावे म्हणतात. या लोकांनी जाणीवपूर्वक सीमावर्ती जिल्हे व गावे विकासापासून वंचित ठेवले, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. काँग्रेसला भाषा, प्रदेश आणि जातीपातीच्या आधारावर भारत तोडायचा आहे, त्यामुळे या निवडणुकीत जनतेला पुन्हा एकदा काँग्रेसला चांगलाच धडा शिकवावा लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यावेळी भाजपाच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि मोदींच्या हमीवर विश्वास ठेवून, देशात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन करून, विकसितभारताचा संकल्प पूर्ण करण्यात महत्त्वाचे योगदान द्या, असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले. (Pm Narendra Modi)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.