महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस स्वबळावरच ठाम! काय म्हणतात नेते?

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी सातत्याने स्वबळाची भूमिका घेतली. काँग्रेस स्थापना दिवसाच्या निमित्ताने मुंबई काँग्रेसच्यावतीने आझाद मैदानात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला. मुंबई काँग्रेसच्यावतीने ऑगस्ट क्रांती मैदान येथे काँग्रेस स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, अस्लम शेख, नसीम खान माणिकराव ठाकरे, चरणसिंग सप्रा व इतर कॉंग्रेसी नेते पदाधिकारी उपस्थित होते.

काय म्हणाले भाई जगताप?

मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आणि आजही हेच सांगतो 236 जागांवर काँग्रेस उमेदवार निवडणूक लढवेल, असे भाई जगताप म्हणाले. काँग्रेसचे गतवैभव परत आणण्याचा आम्ही मुंबईत प्रयत्न करु, असेही जगताप म्हणाले. आज काँग्रेस 137 व्या वर्षात पदार्पण करत आहे. सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो, स्वातंत्र्यांच्या 75 वर्षांमध्ये देशात अशा प्रकारची पद्धत कधीही पाहिली नाही की, राज्यपालांकडून अनेक गोष्टींमध्ये हस्तक्षेप केला जातो. महाराष्ट्राचे राज्यपाल ज्या पद्धतीने आज वागत आहेत हे योग्य नाही. हात दाखवून ओपन मतदान आपण घेऊ शकतो, तर मागच्यावेळेस सुद्धा अशीच पद्धत अवलंबली होती, मग आताच काय झाले?, असा सवाल भाई जगताप यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केला. लोकशाहीच्या चौकटीला कोणीही हात लावू नये, येणाऱ्या काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष असेल अशी खात्री असल्याचं भाई जगताप म्हणाले.

(हेही वाचा मालेगाव बॉम्बस्फोट : हिंदुत्ववाद्यांविरोधात कारस्थान! साक्षीदाराचा धक्कादायक खुलासा)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here