कर्नाटकातील काँग्रेस सरकार विधानसभा सभागृहातून काढणार Veer Savarkar यांची प्रतिमा; भाजपाकडून निषेध

101

सवंग लोकप्रसिद्धीसाठी काँग्रेस कायम वीर सावरकर (Veer Savarkar) यांचा वापर करत असते. जेव्हा जेव्हा काँग्रेसला राजकीयदृष्ट्या अस्थिर वाटू लागते तेव्हा तेव्हा काँग्रेसचे नेते राहुल गांधी वीर सावरकर यांच्या बिनबुडाचे आरोप करून चर्चेत राहतात. त्याची री काँग्रेसचे सरकार असलेले कर्नाटक सरकार ओढत आहे. कर्नाटकात २०२२मध्ये भाजपचे सरकार होते तेव्हा तेथील विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांची प्रतिमा लावली होती, आता ती प्रतिमा काढण्याचा निर्णय तेथील काँग्रेस सरकारने घेतला आहे. यानिमित्ताने काँग्रेसचा पुन्हा एकदा सावरकर द्वेष समोर आला आहे. याचा आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी X वर पोस्ट करत याचा निषेध केला आहे.

(हेही वाचा Veer Savarkar यांचा अवमान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात नाशिक न्यायालयाने बजावले समन्स)

काय म्हणाले बावनकुळे? 

स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय अत्यंत निंदनीय आहे. उद्धव ठाकरे याचा निषेध करणार की नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसणार?, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा थेट सवाल केला. उबाठा गटाला आता ‘टीपू सेना’ म्हणण्याची वेळ आली आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अत्यंत निंदनीय आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अपमान करणारा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या यातना, त्यांचे बलिदान आणि त्यांचे विचार यांची अवेहलना करण्याचा काँग्रेसचा हा डाव आहे.सत्तेसाठी लाचार झालेले आणि मतांसाठी हिंदुत्ववादी भूमिका सोडलेले उद्धव ठाकरे याचा निषेध करणार की नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसणार? काँग्रेससोबत आघाडी करताना ठाकरे यांनी सावरकरांच्या विचारांना मूठमाती दिली आहे. त्यामुळेच आज त्यांना ‘टीपू सेना’ म्हणण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे  (Veer Savarkar) विचार अमर आहेत, त्यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना इतिहास कधीही माफ करणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.