तेलंगणामधील काँग्रेसच्या (Congress) रेवंत रेड्डी सरकारने मुस्लिम तुष्टीकरणाची परिसीमा ओलांडली आहे. सरकारने सरकारी आणि खासगी कार्यालयांत कर्मचाऱ्यांना संपूर्ण महिनाभर अर्धा दिवस कामावर येण्याची सवलत दिली आहे. सरकारने काढलेल्या आदेशानुसार राज्यातल्या सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना दुपारी ४.०० वाजताच ऑफिस सोडण्याची मूभा देण्यात आली. ही मुभा संपूर्ण रमजान महिना म्हणजे ४ मार्च ते ३१ मार्च एवढ्या दीर्घकालासाठी देण्यात आली.
तेलंगणामध्ये आधीच ४% मुस्लिम आरक्षण अस्तित्वात आहे. त्यात आता मुस्लिम कर्मचाऱ्यांना दुपारी ४.०० वाजताच कार्यालय सोडण्याची मुभा देऊन काँग्रेस (Congress) सरकारने देऊन मुस्लिम तुष्टीकरणाची हद्द ओलांडली आहे. संपूर्ण रमजान महिन्यामध्ये मुस्लिमांना सामुदायिक धार्मिक कार्यक्रमांमध्ये सामील होण्यासाठी ही सवलत देण्यात आली आहे. यामध्ये सरकारच्या सर्व डिपार्टमेंट मधल्या मुस्लिम कर्मचाऱ्यांचा, खासगी क्षेत्रातील मुस्लिम कर्मचाऱ्यांचा, आउटसोर्स केलेल्या मुस्लिम कर्मचाऱ्यांचा, शाळेतल्या महाविद्यालयांमधल्या मुस्लिम शिक्षकांचा, कॉन्ट्रॅक्टवरच्या मुस्लिम कर्मचाऱ्यांचा, कॉर्पोरेट क्षेत्रातील मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे.
अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना देखील या सवलतीचा लाभ मिळणार आहे, पण त्यांची सेवा आवश्यक असेल, तेवढ्यापुरतेच त्यांना दुपारी ४.०० नंतर कामावर बोलवण्यात येणार आहे. तेलंगणच्या काँग्रेस (Congress) सरकारने आजच हे आदेश जारी केले. १० दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव, ९ दिवसांचा नवरात्र उत्सव किंवा अन्य कुठला उत्सव साजरा करण्यासाठी सरकारी किंवा प्रायव्हेट क्षेत्रातील हिंदू कर्मचाऱ्यांना किंवा अन्य धर्मीय कर्मचाऱ्यांना अशी कुठली सवलत तेलंगण सरकारने दिल्याच्या बातम्या यापूर्वी दिसल्या नव्हत्या.
Join Our WhatsApp Community