गांधीच्या इच्छेनुसार काँग्रेस विसर्जित झाली असती, तर…पंतप्रधान मोदींचा घणाघात

118

अनेक जण सध्या देश काँग्रेसमुळे उभा राहिला, आज जे काही दिसते, ते काँग्रेसमुळे आहे, असा दावा करता आहेत. त्यांना आठवण करून द्यावीशी वाटते की, महात्मा गांधींना स्वातंत्र्यानंतर काँग्रेस विसर्जित करायची होती, कारण त्यांना माहीत होते की, स्वातंत्र्यानंतर हे लोक कसा कारभार करतील, म्हणून त्यांनी काँग्रेस विसर्जित करण्याचा विचार मांडला होता. जर गांधीचा तो विचार अमलात आणला असता तर देशात आजचे चित्र निराळे दिसले असते, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७० वर्षांतील काँग्रेसच्या चुकांचा पाढाच वाचून दाखवला. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती यांच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत उत्तर दिले. लोकसभेनंतर सलग दुसऱ्या दिवशी पंतप्रधान यांनी संसदेत भाषण केले.

…तर लोकशाही घराणेशाहीपासून मुक्त राहिली असती

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘ जर स्वातंत्र्यानंतर काँग्रेस जर नसती तर ही लोकशाही घराणेशाहीपासून मुक्त राहिली असती. हा देश विदेशी ऐवजी स्वदेशीच्या संकल्पावर चालला असता, आणीबाणी आली नसती, देशात जातीयवाद राहिला नसता, शिखांचे हत्याकांड झाले नसते, तिथे दहशतवाद नसता, काँग्रेस जर नसती तर पंडितांना काश्मिर सोडावं लागले नसते, सर्वसामान्य माणसांना मुलभूत सोईसुविधांसाठी वाट पहावी लागली नसती’, असा घणाघाती हल्ला पंतप्रधान मोदी यांनी केला.

(हेही वाचा नेहरूंनी स्वत:ची प्रतिमा जपण्यासाठी गोव्याला पारतंत्र्यात ठेवले!)

काँग्रेसने घराणेशाही आणली 

काँग्रेसने घराणेशाहीच्या पुढे कधी विचार केला नाही. देशाला सर्वात मोठा धोका हा घराणेशाही असलेल्या पक्षांपासून आहे. पक्षात जेव्हा एक कुटुंब प्रभावशाली बनते तेव्हा सर्वात पहिलं गुणवत्ता धोक्यात येती. सर्व पक्षांनी त्यांच्या त्यांच्या पक्षात लोकशाही अंमलात आणली पाहिजे, काँग्रेसने याचा सर्वात आधी याचा विचार केला पाहिजे, कारण हा पक्ष सर्वात जुना आहे, असेही मोदी म्हणाले.

काँग्रेसच्या पंतप्रधानाने ५० राज्य सरकारे बरखास्त केलेली

“मी गुजरातमध्ये मुख्यमंत्री होतो तेव्हा माझ्यावर बराच अन्याय केला. तरीही मी गुजरातचा विकास हा देशासाठी आहे, असेच म्हणायचो. काँग्रेसच्या काळात राज्यांवर बेबंदशाही लादण्यात आली होती. काँग्रेसने आतापर्यंत जवळपास १०० वेळा निवडून आलेल्या विविध राज्य सरकारला फेकून दिले होते, तेव्हा तुम्ही कोणत्या तोंडाने लोकशाहीबद्दल बोलत आहात. एका पंतप्रधानांनी ५० राज्य सरकारला फेकून दिले. याचे उत्तर जनतेला द्यावे लागेल. आज त्याची शिक्षा ते भोगत आहेत. कांँग्रेसच्या सत्तेच्या नशेमुळे आज तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये कटुता आली आहे, दोन राज्ये निर्माण करण्यासाठी मिलीटरी वापरली, अशी टीका मोदी यांनी काँग्रेसवर केली.

(हेही वाचा हुंडाई, केएफसी आता पिझ्झा हट…स्वतंत्र काश्मीरचा पुरस्कार सुरूच)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.